सोमवार (५ ऑक्टोबर) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएल २०२०चा १९वा सामना होणार आहे. दुबई येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे. आतापर्यंत ३ सामने जिंकलेले हे दोन्ही संघ आजचा चौथा सामना जिंकण्यासाठी अथक परिश्रम करताना दिसतील. मात्र सामन्यापुर्वी दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे.
दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्रा दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. शारजाह येथे ३ ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती.
मिश्राचा स्कॅन रिपोर्ट अजून तरी आलेला नाही. पण दिल्ली संघाने सांगितले आहे की, “मिश्राच्या गोलंदाजी करण्याच्या हाताला (उजवा हात) दुखापत झाली आहे. त्यामुळे बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे संघ त्याच्याबाबत कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाही.”
मिश्राच्या गैरहजेरीमुळे दिल्ली संघाला बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात विराटचा सामना करणे खूप अवघड जाणार आहे. कारण विराट फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसला आहे. पण मिश्राच्या जागी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
दिल्ली संघ आयपीएल २०२०मध्ये शानदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या संघाला यावर्षी आयपीएलच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ ३ मोठे विक्रम असतील विराट कोहलीच्या निशाण्यावर
वेळ निघून जात आहे! गौतम गंभीरचा राजस्थानच्या ‘या’ दोन खेळाडूंना इशारा
ट्रेंडिंग लेख-
दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
अवघड झालंय! ‘या’ ३ संघाचे आयपीएल प्ले ऑफचे मार्ग जवळपास बंद