---Advertisement---

“दिनेश कार्तिकच्या जागी ‘या’ विश्वविजेत्या कर्णधाराने करावे नेतृत्त्व,” पाहा कुणी केलंय हे मोठं विधान

---Advertisement---

गेल्या २ वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्त्व करत आहे. पण अद्यापही तो संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली संघाला मोठे यशही मिळालेले नाही. अशात आता दिनेशच्या नेतृत्त्वपदाविषयी मोठे विधान पुढे आले आहे. दिनेशच्या ऐवजी ऑयन मॉर्गनला कोलकाता संघाचा कर्णधार बनवण्यात यावे, असे विधान भारतीय क्रिकेटपटू एस श्रीसंतने केले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत श्रीसंत म्हणाला की, “कोलकाता संघाचे नेतृत्त्व दिनेशने नाही तर विश्वविजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार मॉर्गनने करायला पाहिजे. आशा आहे की, कोलकाता संघ माझ्या या मुद्द्याचा विचार करेल. त्यांना रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहलीसारख्या संघांपुढे आघाडी मिळवायची असेल, तर तशी क्षमता असणाऱ्या व्यक्तीवर संघाचे नेतृत्त्व सोपवावे लागणार आहे.”

३ ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता संघात आयपीएल २०२०चा १६वा सामना झाला होता. या सामन्यात कोलकाता संघ १८ धावांनी पराभूत झाला होता. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात एकवेळ कोलकाता संघ खूप सहजपणे सामना गमावून बसेल असे वाटत होते. पण मॉर्गनने ६व्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोठ-मोठे शॉट लगावले. त्याने केवळ १८ चेंडूत ४४ धावांची ताबडतोब खेळी केली. त्यामुळे कोलकाता संघ २१० धावा तरी करु शकला.

कोलकाता संघाकडे बरेच धाकड फलंदाज आहेत आणि संघामध्ये अंतिम फेरी गाठण्याइतकी क्षमतादेखील आहे. मात्र त्यांची रणनिती जास्त प्रभावी ठरु शकली नाही. अशात श्रीसंतच्या विधानानंतर कोलकाता संघाचे व्यवस्थापक यावर विचार करुन मॉर्गनला संधी देतील का नाही?, पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

फाफ डु प्लेसिसने सांगितले चेन्नई संघाचे वेगळेपण; धोनी, फ्लेमिंगला दिले श्रेय

अनुभवाचे बोल! धोनी करतोय केएल राहुल, मयंक अगरवालला मार्गदर्शन; व्हिडिओ होतोय व्हायरल

IPL – आज बेंगलोर-दिल्ली आमने-सामने; जाणून घ्या सामन्याबद्दल सविस्तर माहिती

ट्रेंडिंग लेख-

अवघड झालंय! ‘या’ ३ संघाचे आयपीएल प्ले ऑफचे मार्ग जवळपास बंद

वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---