---Advertisement---

RCB vs RR: ‘हा’ ठरला बंगळुरुच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

On: रविवार, एप्रिल 13, 2025 8:12 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 28 वा सामना आज राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थानवर 9 विकेट्स आणि 13 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात आरसीबीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, व राजस्थानला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 173 धावा केल्या. नंतर धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी फिल साॅल्टने सर्वाधिक 65 धावा केल्या. ज्यात त्याने 5 चौकार तसेच 6 षटकार झळकावले. साॅल्टच्या खेळीने बंगळुरुने एकतर्फी सामना जिंकला. पण राजस्थान राॅयल्सने त्याला जीवदान दिले रियाने परागने त्याचा सहज झेल सोडला. तो झेल संघाला खुप महागात पडला. शेवटी साॅल्टने सामना आरसीबीच्या खिश्यात टाकला.

शिवाय विराट कोहलीने देखील 45 चेंडूत 62 धावा करत 4 चौकार तर 2 षटकार झळकावले. तसेच देवदत्त पडिकलने 40 धावा केल्या. आरसीबीने फक्त 1 खेळाडू गमावून 15 चेंडू शिल्लक असताना 175 धावांचा पाठलाग केला.

आरसीबीने राजस्थानचा त्यांच्या घरच्या मैदानात पराभव केला आहे आणि जोरदार पद्धतीने सामना जिंकला आहे. आरसीबीचा पुढचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध 18 एप्रिल रोजी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---