आयपीएल 2025 स्पर्धेतील 29वा सामना आज 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दिल्लीच्या कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच मुंबई इंडियन्सला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांचे पाच सामन्यांमधील चार सामने गमावले आहेत. तसेच दिल्लीने स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. मुंबई संघ हार्दिक पांड्याची नेतृत्वाखाली तसेच दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन :
दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेल (कर्णधार), जॅक फ्रेजर मॅकबर्क, अभिषेक पोरेल, के एल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्राज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, रियान रिकलटन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सेंटनर, जसप्रीत बुमराह, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट.







3 माफीनामे आणि मेस्सीसाठी खास मॅसेज! 24 तासांमध्ये रोनाल्डोची दुसरी बाजू समोर