---Advertisement---

वयाच्या चाळीशीत मिश्राजी दाखवतायेत जोश! हैदराबादला मात दिल्यानंतर केला एल्गार

On: शनिवार, एप्रिल 8, 2023 5:06 PM
---Advertisement---

शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) आयपीएल 2023 च्या 10 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने मोठा विजय मिळवला. लखनऊने सनरायझर्स हैदराबाद संघाला 5 विकेट्सने मात दिली. या सामन्यात लखनऊ संघाकडून अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याने पदार्पण केले. या सामन्यात मिश्राची कामगिरी दमदार झाली. चाळीशीत अशा प्रकारचे कामगिरी केल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अमित मिश्रा याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा खर्च करत 2 धावा घेतल्या. त्याने वॉशिंग्टन सुंदर व आदिल रशीद यांना तंबूचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे डावातील 19 वे षटक टाकले. त्याआधी त्याने एक अप्रतिम झेल देखील टिपला होता. वयाच्या 40 व्या वर्षी केलेल्या या अफलातून कामगिरीनंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,

“जोपर्यंत माझ्यात आग आहे तोपर्यंत मी खेळत राहणार. तसेच नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. कर्णधार राहुलने मला पूर्ण मोकळीक दिली होती. तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे तो म्हणाला.”

अमित मिश्रा याने त्याच्या कारकीर्दीत यापूर्वी 3 संघांकडून खेळला. त्यात दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश होता. मागील वर्षी त्याला कोणत्याही संघाने संधी दिली नव्हती आता त्याचा चौथा संघ लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 155 सामने खेळले असून, यामध्ये त्याने 168 विकेट्स मिळवल्या आहेत. सर्वाधिक आयपीएल विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. आणखी 3 विकेट्स घेताच तो लसिथ मलिंगा (170) याचा विक्रम मोडू शकतो.

(Amit Mishra Said I Will Play Till Fire In Me After Performing For Lucknow Supergiants In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवख्या जयसवालचा गुवाहाटीत धमाका! पहिल्याच ओव्हरमध्ये केली ‘अशी’ कामगिरी, थेट गेल-वॉर्नरच्या यादीत नाव
विमानात ब्लॉग करायला निघालेल्या चाहरला धोनीने दिलं हाकलून? दोनदा झाली ‘हटाई’, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---