---Advertisement---

भारताच्या आशा धूळीत! अव्वल बॉक्सर अमित पंघलला रिओ ऑलिंपिक विजेत्या मार्टिनेझने दिली ऑलिंपिक पदार्पणात मात

On: शनिवार, जुलै 31, 2021 8:27 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या नवव्या दिवसाची (३१ जुलै) सुरुवात भारतासाठी अत्यंत निराशाजनक झाली. महिलांच्या डिस्कस थ्रोमध्ये दोन वेळची पदक विजेती सीमा पुनिया पदक मिळवण्याची स्पर्धेतून बाहेर झाली. तिरंदाजीत अतनू दास पराभूत होऊन ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर आता बॉक्सिंगमधूनही वाईट बातमी येत आहे. पुरुष बॉक्सिंगच्या ५२ किलो वजनी गटातील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या अमित पंघलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलंबियाच्या युबेरजेन मार्टिनेझने अमितला ४-१ ने पराभूत केले आहे. त्यामुळे भारताच्या अपेक्षांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.

विशेष म्हणजे ऑलिंपिक पदार्पण करत असलेल्या अमितने पहिल्या राऊंडमध्ये बचावासह आक्रमणही केले. त्यामुळे तो ४-१ ने विजयी झाला. मात्र, पुढील दोन्ही राऊंडमध्ये मार्टिनेझने पुनरागमन केले. (Amit Panghal On His Olympic Debut Goes Down 4-1 To Rio 2016 Silver Medalist Herney Martinez)

रिओ ऑलिंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मार्टिनेझने दुसऱ्या राऊंडमध्ये ४-१ आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ५-० ने विजय मिळवला. तिसऱ्या राऊंडमध्ये अमितला केवळ एका परीक्षकाने ८ गुण दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---