भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विराट व अनुष्का यांच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतलेला असून, मुलीच्या जन्माबद्दल संपूर्ण देशवासीयांकडून त्यांना शुभेच्छा मिळत आहेत. अशातच जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अमिताभ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ज्या भारतीय क्रिकेट खेळाडूना मुलगी आहे, त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. या पोस्टद्वारे अमिताभ यांनी भविष्यातील महिला टीम अशी असू शकते, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची मुलगी झीवा धोनी कर्णधार बनू शकते, असेही संकेत दिले आहे.
अमिताभ यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये सुरेश रैना, गौतम गंभीर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, ऋद्धिमान साहा, हरभजन सिंह, टी नटराजन, उमेश यादव आणि विराट कोहली या खेळाडूंना मुलगी असल्याचे सांगितले आहे. यानंतर बच्चन यांनी कॅप्शन मध्ये धोनीला देखील मुलगी असून ती कर्णधार असू शकते असा सल्ला दिला आहे.
T 3782 – An input from Ef laksh ~
"… and Dhoni also has daughter .. will she be Captain ? ????'' pic.twitter.com/KubpvdOzjt
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 13, 2021
दरम्यान अमिताभ यांनी हे ट्विट विनोदी शैलीत केले असल्याचे स्पष्ट होत आहे. अमिताभ हे नेहमीच क्रिकेट संदर्भात ट्विट करत असतात व ते भारतीय क्रिकेट संघाचे फार मोठे चाहते आहेत. विशेषतः अमिताभ हे सचिनच्या सर्वात मोठ्या फॅन पैकी एक आहेत, असे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अन् डिलिव्हरीने थेट बोल्ड’, खास कार्टून प्रसिद्ध करत ‘अमूल’कडून ‘विरूष्का’ला शुभेच्छा; पाहा फोटो
AUS v IND : कुठे व केव्हा होणार चौथा कसोटी सामना, जाणून घ्या सर्वकाही
“हॉटेलच्या खोलीत येताच तो रडू लागला”, आर अश्विनच्या पत्नीचा मोठा खुलासा






