ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने 17 सदस्यीय महिला संघाची निवड केली आहे. माजी कर्णधार एमी सॅटरथवेटने अष्टपैलू जेस वॅटकीनसह पुनरागमन केले आहे. , तर लेगस्पिनर डियाना डॉटीची प्रथमच संघात निवड झाली.
गेल्या वर्षी सॅटरथवेट आई झाली आणि आता ती प्रसूतीच्या सुट्टीनंतर परतली आहे. वॅटकिन 2018 मध्ये संघाकडून खेळली. डॉटीला पदार्पणाची या मालिकेत आशा असेल. 26 सप्टेंबरपासून तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्या जाणार्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा महिला संघ 9 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. टी20 नंतर तीन एकदिवसीय सामने 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या निवेदनात महिला कर्णधार सोफी डेव्हिन म्हणाली,’नक्कीच आम्ही मालिका जिंकण्यासाठी तिथे जात आहोत. ऑस्ट्रेलिया संघाबरोबर खेळायचे असल्याने हा नक्कीच कठीण दौरा ठरेल. आमचा संघ अनुभवी आहे आणि एमी देखील संघात परतली आहे जी आमची फलंदाजी मजबूत करेल. ‘
न्यूझीलंड संघ खालीलप्रमाणे आहेः
सोफी डेव्हिन (कॅप्टन), सूझी बेट्स, नॅटली डॉड, डायना डॉटी, लॉरेन डाऊन, मॅडी ग्रीन, होली हडलस्टन, हॅली जेन्सन, एमेलिया केर, जेस केर, रोजमेरी मेयर, कॅटी मार्टिन, कॅटी पेरकिन्स, हन्ना रोव्ह, एमी सॅटरथवेट, ली तहुहु आणि जेस वॅटकीन.