मंगळवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मधील आपला पहिला सामना जिंकला. हंगामातील हा 16वा सामना असून मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याने सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. चावलाने चार षटकात 22 धावा खर्च करत तीन महत्वपूर्ण विकेट्स नावावर केल्या. या अप्रतिम प्रदर्शनानंतर चावलाच्या नावावर आयपीएल इतिहासातील मोठा विक्रम नोंदवला गेला.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या सामन्यात प्रथम गोलंदाजी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ 19.4 षटकात 172 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात मुंबईने डावातील शेवटच्या चेंडूवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. पियुष चावला (Piyush Chawla) याने दिल्लीच्या मनीष पांडे, रॉवमन पॉवेल यांना पायचीत केले, तर ललित यादव याचा त्रिफळा उडवला. पांडेने 26, पॉवेलने 4, तर यादवने 2 धावा करून विकेट्स गमावल्या. दिल्लीच्या डावातील 13व्या षटकात चावलाने ललित यादवाला त्रिफळाचीत केले आणि मोठा विक्रम नावावर केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक विक्रम घेणाऱ्यांमध्ये आता चावलाचे नाव संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर घेतले जाईल.
पियुष यावलाने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 44 खेळाडूंना त्रिफळाचीत केले आहे. तसेच कोलकाता नाईट रायडर्संचा सुनील नरेन यानेदेखील आतापर्यंत 44 खेळाडूंना त्रिफळाचीत केले आहे. या दोघांनंतर राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आणि चेन्नई सुपर किंग्जचा रविंद्र जडेजा यांची नावे येतात. या दोघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी 35-35 खेळाडूंना त्रिफळाचीत केले आहे.
दरम्यान, मंगळवारी झालेल्या दिल्ली आणि मुंबईच्या सामन्यावर नजर टाकली, तर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर(51) आणि अष्टपैलू अक्षर पटेल (54) यांनी संघासाठी अर्धशतके ठोकली. मुंबईसाठी पियुष चावलाव्यतिरिक्त जेसन बेहरनडॉर्फ याने तीन विकेट्स घेतल्या. तर रिले मॅडेरिथ याने 2 विकेट्स घेतल्या. 173 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी जेव्हा मुंबई संघ फलंदाजीला आला, तेव्हा रोहित शर्मा आणि ईशान किशन (31) यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. रोहितने 45 चेंडूत 65 धावा करत आपल्या अर्धशतकाचा दुष्काळ संपवला. (An important record in the IPL was registered on name of Piyush Chawla)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर बीसीसीआयसमोर नमली पीसीबी! वर्ल्डकप सामने खेळण्यासाठी ठेवली केवळ एक अट
मुंबईने खोलले खाते! थरारक सामन्यात अखेरच्या चेंडूवर दिल्लीला नमवले