---Advertisement---

‘या’ कारणामुळे हाॅकी सोडून क्रिकेटर बनला ‘हा’ स्टार खेळाडू! वडिलांनी सांगितली रंजक गोष्ट

---Advertisement---

सध्या आयपीएल 2025चा हंगाम सुरू आहे. दिवसेंदिवस आयपीएलचा रोमांच वाढत चालला आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत सर्वात मजबूत दिसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) देखील दिल्लीच्या संघात आहे. तो सध्या गोलंदाजांसाठी एक दहशत आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? जर क्रिकेट नसतं तर कदाचित तो आज हॉकीच्या मैदानावर हाॅकी स्टीक फिरवताना दिसला असता.

ट्रिस्टनचे पहिले प्रेम क्रिकेट नव्हते तर हॉकी होते. त्याला त्याचे वडील ख्रिस स्टब्ससारखे हॉकीमध्ये नाव कमवायचे होते. ट्रिस्टनचे वडील ख्रिस स्टब्स हे महान आफ्रिकन हॉकी खेळाडूंमध्ये गणले जातात. त्यांनी विभागीय पातळीवर खूप प्रसिद्धी मिळवली, परंतु राष्ट्रीय संघात पोहोचण्यात ते अपयशी ठरले.

ट्रिस्टन स्टब्सचे वडील ख्रिस स्टब्स यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, त्यांना त्यांच्या हॉकी कारकिर्दीत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. जिथे पैसा आणि स्थिरता कमी असते तिथे ट्रिस्टनला त्याच आव्हानांना तोंड द्यावे असे त्यांना वाटत नव्हते. म्हणूनच त्यांनी त्याला क्रिकेटमध्ये रस घेण्यास प्रोत्साहित केले.

ट्रिस्टन स्टब्सचे वडील ख्रिस स्टब्स म्हणाले की, “हॉकीमध्ये पैसे नसतात, हा एक मेहनती खेळ आहे, तो मजेदार आहे, पण करिअरसाठी तो चांगला नाही.” याचा परिणाम असा झाला की ट्रिस्टनने त्याचे वडील ख्रिस यांचा सल्ला स्वीकारला आणि हॉकीऐवजी क्रिकेटमध्ये रस घेऊ लागला. सध्या तो आयपीएलमध्ये व्यस्त आहे. येथे तो अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.

ख्रिस स्टब्सला अजूनही दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय हॉकी संघात सहभागी होऊ शकले नाही याचा पश्चात्ताप आहे, परंतु त्यांना अभिमान आहे की त्यांनी भारताविरुद्ध हॉकी सामना खेळला.

ख्रिस हसले आणि म्हणाले, “मी विभागीय पातळीवर हॉकी खेळलो, पण देशासाठी खेळण्याइतका चांगला नव्हतो. माझा सर्वात संस्मरणीय सामना भारताविरुद्धचा होता. 90च्या दशकात जेव्हा भारत दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत होता, तेव्हा मी सदर्न ट्रान्सवालकडून खेळलो. तो एक सराव सामना होता, पण या सामन्यात भारताने आम्हाला 5-0 ने हरवले.

ख्रिस नेहमीच स्वप्न होते की, त्यांचा मुलगा एक दिवस देशासाठी खेळेल. त्याच्या जर्सीवर त्याच्या देशाचा ध्वज असावा. ट्रिस्टनने त्याच्या वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. ट्रिस्टनने त्याच्या बालपणी हॉकी खेळण्यापासून खूप काही शिकले आहे. चेंडूवर नियंत्रण, अचूक वेळ आणि ताकद, हे सर्व त्याने हॉकीकडून शिकले आहे.

ख्रिस म्हणाले, “ट्रिस्टन नेहमीच क्रिकेटचा वेडा होता, पण हॉकीने त्याला आणखी परिष्कृत केले. त्याच्या रिव्हर्स स्वीप आणि स्वीप शॉट्समध्ये हॉकीची झलक दिसते. लहानपणी तो हॉकी स्टिक आणि बॉलने खेळायचा.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---