मुंबई| महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस 100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत आनंद कोठारी, नितीन किर्तने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
डॉ. जी.ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 35 वर्षांवरील पुरुष एकेरी गटात बिगरमानांकीत आनंद कोठारीने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित दत्ता रेवांतचा 7-5, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. रमझान शेखने रिषभ मेहताचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्ठात आणले.
45 वर्षांवरील पुरुष गटात अव्वल मानांकित नितीन किर्तने याने तिसऱ्या मानांकित जिगर जेटलीला 6-0, 6-1 असे पराभूत केले. दशरथ साळवीने विनायक बेटगिरीला 6-0, 6-1 असे नमविले.
55 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत हिमांशू गोसावीने फिरदोस श्रॉफवर 6-3,6-4 असा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 35 अधिक पुरुष गट: उपांत्य फेरी:
आनंद कोठारी(भारत) वि.वि.दत्ता रेवांत(भारत)(3) 7-5, 3-6, 6-4;
रमझान शेख(भारत) वि.वि.रिषभ मेहता(भारत) 6-2, 6-2;
45 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी:
नितीन किर्तने(भारत) (1) वि.वि.जिगर जेटली(भारत)(3) 6-0, 6-1;
दशरथ साळवी(भारत) वि.वि.विनायक बेटगिरी(भारत)6-0, 6-1;
55 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्य फेरी:
हिमांशू गोसावी(भारत)वि.वि.फिरदोस श्रॉफ(भारत) 6-3,6-4;
गजानन कुलकर्णी(भारत)वि.वि.आशिष डिके(भारत)3-6,6-3, 10-5
65 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
राजीव वालिया(भारत)वि.वि. ताहीर अली(भारत)(3) 6-3, 6-4;
विनायक गुजराथी(भारत)(2) वि.वि.एकनाथ किणीकर(भारत)6-4, 7-5.
महत्त्वाच्या बातम्या-
नवले आणि खटावकरच्या शतकी खेळीच्या जोरावर ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीच्या ३३५ धावा
सुट्टी नाय..! ‘भारताविरुद्ध पराभव झाल्यास घरी येऊ देणार नाही…’, पाकिस्तानच्या कर्णधाराला धमकी
शास्त्रींपेक्षा जास्त पगार ते भारतीय संघाहून अधिक जबाबदारी, द्रविडसाठी बीसीसीआयची मोठी योजना