पुणे । बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित पहिल्या पॅरा स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अनंत मेहता याने मध्यप्रदेशच्या उदित राय याचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुंबईच्या अनंत मेहता याने मध्यप्रदेशच्या उदित रायचा 3-1(32-28, 44-19, 08-39, 55(22)-11) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षीय अनंत हा नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे सराव करत असून टायचे पहिलेवहिले विजेतेपद आहे.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत मध्यप्रदेशच्या उदित राय याने महाराष्ट्राच्या शयान शेट्टीचा 3-1(40(24)-26, 23-41, 41-17, 52-07)असा तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुंबईच्या अनंत मेहता याने औरंगाबादच्या हरविंदर सिंगचा 3-0(40-02, 45-08, 40-01) असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीएसएएमचे अध्यक्ष राजन खिंवसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीएसएएमचे मानद सचिव रिषभ कुमार, खजिनदार शेखर सुर्वे, अमित सप्रू, राजा सुब्रमणियन, सलील देशपांडे आणि राजवर्धन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
पॅरा स्नूकर।
उपांत्य फेरी।
उदित राय(मध्यप्रदेश)वि.वि.शयान शेट्टी(महाराष्ट्र)3-1(40(24)-26, 23-41, 41-17, 52-07);
अनंत मेहता(महाराष्ट्र)वि.वि.हरविंदर सिंग(महाराष्ट्र)3-0(40-02, 45-08, 40-01);
अंतिम फेरी।
अनंत मेहता(महाराष्ट्र)वि.वि.उदित राय(मध्यप्रदेश)3-1(32-28, 44-19, 08-39, 55(22)-11).