भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील जवळजवळ 6 महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याची कमी आजही भारतीय संघाला जाणवते, तसेच भारतीय संघाच्या बसमध्ये आजही त्याच्या जागेवर कोणीही बसत नाही, असा खूलासा भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने केला आहे.
सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील तिसरा टी20 सामना हेमिल्टनला होणार असल्याने भारतीय संघ ऑकलँडवरुन हेमिल्टनला जात असताचा एक व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ चहल टीव्हीचा आहे. चहल टीव्ही नावाने होणाऱ्या या शोमध्ये भारतीय संघाचे विविध दौऱ्यामधील मुलाखती चहलने घेतल्या आहेत.
सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील या व्हिडिओत दिसते की प्रवासादरम्यान चहल भारतीय संघातील खेळाडूंच्या मुलाखती घेत आहे. या व्हिडिओच्या शेवटी चहल बसमधील सर्वात मागच्या सीटवर जाऊन बसतो आणि म्हणतो ‘ही ती सीट आहे जिथे एक दिग्गज बसत होता. माही भाई. आता इथे कोणी बसत नाही. आम्हाला त्याची फार आठवण येते.’
MUST WATCH: We get you Chahal TV from the Bus! ????
This one is en route from Auckland to Hamilton ???????? – by @RajalArora @yuzi_chahal #TeamIndiaFull Video here ➡️➡️ https://t.co/4jIRkRitRh pic.twitter.com/ZJxMtRGsQu
— BCCI (@BCCI) January 27, 2020
तसेच या व्हिडिओमध्ये चहलने जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि रिषभ पंत यांच्याशीही संवाद साधला आहे.
धोनी भारतीय संघाकडून शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबद्दल भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा होत असते.
आयपीएलपू्र्वी 'हा' खेळाडू करेल भारतीय संघात पुनरागमन; रिकी पाँटिंगचे भाकित…
वाचा- ????https://t.co/QPjsu83FkQ????#म #मराठी #Cricket @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020
अबब! रिषभ पंतच्या या मित्राने फक्त २ सामन्यांमध्ये पूर्ण केल्या ५०० धावा…
वाचा- ????https://t.co/TN4Si6QOdo????#म #मराठी #Cricket @RishabhPant17— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020






