भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतला आहे. विराट कोहलीची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या गर्भवती असून, जानेवारी महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे विराटने पालकत्व रजा घेण्याचा निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला असून, अनेकांनी त्याला वेगवेगळे सल्ले दिले आहेत.
यातच ऑस्ट्रेलियाची न्यूज अँकर क्लॉय अमांडा बेलीने विराटला हटके सल्ला दिला आहे. तिने विराटच्या मुलाने ऑस्ट्रेलियाकडून खेळावे अशी मागणी केली आहे.
ऑस्ट्रेलियन अँकरचा विराटला सल्ला –
ऑस्ट्रेलियन अँकर क्लॉय अमांडा बेलीने विराट कोहलीकडे मागणी केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की विराट कोहली व अनुष्का शर्मा यांनी आपल्या मुलाला ऑस्ट्रेलियामध्ये जन्म द्यावा, जेणेकरून तो भविष्यात ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज बनेल. महिला अँकरने ट्विटरवर एक मजेशीर मीम शेअर करत आपली मागणी स्पष्ट केली आहे. या ट्विटमध्ये तिने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांच्या हेराफेरी चित्रपटातील एका मीमचा वापर केला आहे. अर्थातच ही सर्व मागणी तिने विनोदातून केलेली आहे.
Dear @imVkohli & @AnushkaSharma, can you please have your baby in Australia so he can potentially be Australia's greatest future batsman ever. Cheers.
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) November 10, 2020
True but #AUSvIND https://t.co/0rNNdsS7fV pic.twitter.com/zqF6Abhx8B
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) December 23, 2020
विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघावर दडपण –
26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहली भारतात परतला असल्याने भारतीय संघावर दडपण आले आहे. पहिल्या सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाला केवळ 36 धावा करता आल्याने भारताला पराभव पत्कारावा लागला. अशा नाजूक क्षणी विराट भारतात परतला असल्याने अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान विराटच्या अनुपस्थित अजिंक्य रहाणे मालिकेतील उर्वरित सर्व सामन्यांसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की अजिंक्यच्या नेतृत्वात 26 तारखेपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मैदानात कशाप्रकारे पुनरागमन करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया घाबरु नका! ‘ही’ आहे ऑस्ट्रेलिया संघाची सर्वात मोठी कमजोरी
कुठे व कधी होणार भारत-ऑस्ट्रलिया बॉक्सिंग डे कसोटी, जाणून घ्या सर्वकाही
व्हिडिओ : फलंदाज बाद नसूनही अंपायरने दिले आऊट; समालोचक वैतागून म्हणाला, “बस आता खूप झालं”
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला