यंदाच्या आयपीएल हंगामातील 53वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स (KKR vs RR) संघात खेळला गेला. दोन्ही संघ ईडन गार्डन्सच्या मैदानावर आमने-सामने होते. या चुरशीच्या लढतीत केकेआरने 1 धावेने शानदार विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा देखील जिवंत ठेवल्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान केकेआरसाठी रहमानुल्लाह गुरबाज आणि सुनील नरेन यांनी डावाची सुरूवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे 35 आणि 11 अशा धावसंख्येवर बाद झाले. तर कर्णधार अजिंक्य रहाणे 30 आणि अंगक्रिष रघुवंशीने 44 धावांची खेळी. यानंतर एकवेळी वाटत होते की केकेआरची धावसंख्या 200 धावांच्या आत होईल. पण आंद्रे रसेलने (Andre Russell) मैदानात तुफान आणले. तो या सामन्याचा नायक ठरला.
रसेलने 25 चेंडूत 57 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकारांसह 6 खणखणीत षटकार ठोकले. ज्यावेळी रसेल फलंदाजीला आला त्यावेळी 15.2 षटकानंतर रसेलची धावसंख्या 9 चेंडूत 2 धावा अशी होती. परंतु रसेलने पुन्हा आक्रमक खेळ दाखवला आणि 20 षटकानंतर रसेलने 25 चेंडूत 228च्या स्ट्राईक रेटने नाबाद 57 धावा केल्या. दरम्यान केकेआरच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देखील आंद्रे रसेललाच देण्यात आला.
???????????????????????????? ???????????????????? ???????? ???????????????? ???????????????????????????? ????
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
Display of brute force from #KKR's very own Andre Russell ????
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR | @Russell12A pic.twitter.com/YfXiU3dF6h
HAMMERED, ft. Andre Russell ????
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2025
He breaks the shackles with a couple of powerful strikes! ????
Updates ▶ https://t.co/wg00ni9CQE#TATAIPL | #KKRvRR | @Russell12A pic.twitter.com/A0awr1owhP






