वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल (Andre Russle) जगातील सगळ्याच फ्रेंचाईजी लीगमध्ये भाग घेतो. सध्या तो अमेरिकामध्ये खेळल्या जात असलेल्या मेजर लीग क्रिकेट 2025 (Major League Cricket 2025) मध्ये खेळत आहे. तो या लीगमध्ये लॉस एंजिल्स नाइट राइडर्स संघाकडून खेळत आहे. मागच्या सामन्यात त्याने वॉशिंग्टन फ्रीडम संघाविरुद्ध शानदार पारी खेळली आणि यादरम्यानच त्याने एक मोठा कारनामा केलेला आहे. आंद्रे रसल टी-20 क्रिकेटमध्ये 750 षटकार झळकावणारा जगातील तिसरा खेळाडू ठरलेला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये रसलने 750 षटकार झळकावले आहेत. याआधी असे दोनच खेळाडू होते ज्यांनी टी-20 क्रिकेटमध्ये 750 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार झळकावले होते, पण आता रसल 750 षटकार झळकवणारा जगातील तिसरा खेळाडू ठरलेला आहे. रसलच्या आधी हा कारनामा वेस्टइंडीजचा खेळाडू ख्रिस गेल (Khris Gayle) आणि कायरन पोलार्डने केलेला आहे. ख्रिस गेलने 1056 षटकार त्याच्या नावावर केले आहेत. तसेच कायरन पोलार्डने 916 षटकार झळकावले आहेत. आता तिसऱ्या स्थानी रसलचे नाव सामील झाले आहे.
या यादीमध्ये वेस्टइंडीजचा खेळाडू निकोलस पूरणच नाव आहे, ज्याने 641 षटकार झळकावले आहेत. तसेच इंग्लंडचा खेळाडू एलेक्स हेल्स 563 षटकारांसोबत पाचव्या स्थानावर आहे.
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार झळकावणारे फलंदाज
ख्रिस गेल-1056
कायरन पोलार्ड-916
आंद्रे रसल-751
निकोलस पूरन-641
एलेक्स हेल्स-563
रसलने या सामन्यात 13 चेंडू 30 धावांची खेळी केली, त्या दरम्यान त्याने तीन षटकार झळकावले.






