इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत लीगदरम्यान खेळाडूंसोबत फ्रँचायझींचे करार होते. आता ती स्टार खेळाडूंसाठी एक वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. याचे कारण अनेक संघ विदेशी लीगमध्येही प्रवेश करत आहेत. अशातच आता आयपीएलचा संघ कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मसूर यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचे सीईओ वेंकी मसूर यांनी टेलिग्राफला सांगितले की, “भविष्यात असे घडले तर ते खूप चांगले होईल. आम्हाला एक समान व्यासपीठ तयार करायचे आहे. यामुळे आम्हाला आमचा ब्रँड वाढवण्याची, चाहता वर्ग वाढवण्याची आणि जगभरातील क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देण्याची संधी मिळेल.” केकेआर आणि पंजाब किंग्जचे संघ कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही खेळतात अशी माहिती आहे. अलीकडेच, आयपीएल फ्रँचायझींनी दक्षिण आफ्रिकेच्या नवीन लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत.
वेंकी मसूर म्हणाले की, “आदर्श जगात आम्हाला रणनीती आणखी मजबूत करण्याची संधी मिळते. जर आम्ही करारबद्ध खेळाडूंना दीर्घ कालावधीसाठी ठेवू शकलो आणि त्या सर्वांचा वेगवेगळ्या लीगमध्ये वापर करू शकलो, तर मला वाटते की ते खूप चांगले आहे. आशा आहे की कधीतरी ते होईल. उदाहरणार्थ, असे घडल्यास, आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा आंद्रे रसेल जगातील इतर लीगमध्येही त्याच संघासोबत खेळताना दिसतो.”
वेंकी म्हैसूर यांनी असेही संकेत दिले की बीसीसीआय भारतीय खेळाडूंना आगामी काळात परदेशी टी-२० लीगमध्ये खेळण्याची परवानगी देऊ शकते. “अर्थात आम्ही आशा करतो की भविष्यात कधीतरी असे होईल,” तो म्हणाला. जेव्हा आपण या विषयावर चर्चा करतो तेव्हा त्यांच्या बाजूने त्याचे नियोजन सांगितले जाते. तो म्हणाला की मला वाटते की त्याचे मन मोकळे आहे, परंतु त्याला भारतीय क्रिकेट आणि भारतीय खेळाडूंसाठी सर्वोत्तम काय आहे हे शोधणे आवश्यक आहे.
दरम्यान, वेंकी मसूर यांनी केलेलल्या या विधानावर कोणताही शिक्कामोर्तब नाही. त्यामुळे सध्या हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याने या गोष्टी केवळ काल्पनिक असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. मात्र, असे झाल्यास खेळाडूंना आणि सोबतच फ्रँचायझींना या गोष्टीचा निश्चित फायदा मिळू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘जो’ चे शतक अन् साथीदार शून्य धावांवर नाबाद! पाहा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अनोखी खेळी
कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक ‘सुवर्ण’संधी! इतिहास रचत ‘हा’ खेळाडू मिळवणार गोल्ड मेडल
आता होणार बॅझबॉल क्रिकेटचा धमाका! मॅक्यूलम बंधू घडवणार जगभरात तुफानी क्रिकेटर्स