इंग्लंडचा माजी कर्णधार व सर्वकालीन महान अष्टपैलूंपैकी एक असलेला ऍण्ड्रू फ्लिंटॉफ हा त्याच्या निवृत्तीनंतर क्रिकेटची फारसा संलग्न असलेला दिसला नाही. त्यानंतर त्याने प्रोफेशनल बॉक्सिंग तसेच टेलिव्हिजनवर अभिनय करण्यात देखील हात आजमावले. मात्र आता तो पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात पुनरागमन करत असल्याचे दिसते. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यावेळी तो इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये दिसून आला.
फ्लिंटॉफ याने मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक मार्ग चोखंदळले. सुरुवातीच्या काळात तो व्यवसायिक बॉक्सर म्हणून रिंगमध्ये उतरला होता. तर, त्यानंतर त्याने काही इंग्लिश टेलिव्हिजन शो वर अँकरिंग देखील केले. नऊ महिन्यांपूर्वी त्याचा एक गंभीर अपघात झाला होता. या कार अपघातात त्याच्या चेहऱ्याला देखील दुखापत झाली होती. त्यातून आता सुखरूपपणे बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात आला आहे.
कार्डिफ येथे झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडेआधी इंग्लंड संघाचा सल्लागार म्हणून त्याने काम करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यासाठी तो कोणत्याही प्रकारचे वेतन घेणार नाही. आगामी वनडे विश्वचषकासाठी देखील तो इंग्लंड संघासोबत राहण्याची शक्यता आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्याचा विचार केल्यास, यजमान इंग्लंड संघाला या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. तब्बल चार फलंदाजांनी अर्धशतके केल्यानंतर इंग्लंडने 291 अशी मोठी धावसंख्या उभी केली होती. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी डेवॉन कॉनवे व डेरिल मिचेल यांनी नाबद्द शतके झळकावत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला.
(Andrew Flintoff Makes Comeback On Cricket Field As England Consultant)
महत्वाच्या बातम्या –
SL vs BAN Toss: सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात ‘हा’ संघ ‘टॉस का बॉस’, एक बदलासह बांगलादेश उतरणार मैदानात
लखनऊची ताकद वाढली! ‘या’ 9 स्टाफच्या जोरावर पटकावणार IPL 2024चं विजेतेपद, नावं पाहून हादरून जाल






