ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे, जी आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23 या स्पर्धेचा भाग आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या हेड कोचने आश्चर्यकारक विधान केले आहे. अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांचे मत आहे की विदेशी दौऱ्यात अभ्यास सामने खेळण्याची काहीच आवश्यकता नाही.
मॅकडोनाल्डच्या विधानावरून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना होण्याची शक्यता कमीच आहे. या दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेच्या एक आठवडाआधी ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. तेव्हा खेळाडूंनी अभ्यास सामन्यांऐवजी मानसिक आणि शारीरिकपणे ताजेतवाने राहण्यावर भर देण अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे 19 वर्षानंतर भारतात जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.
मॅकडोनाल्ड यांनी सिडनीतील एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले, आम्ही मागील काही विदेशी दौऱ्यांवर मालिकेआधी अभ्यास सामने खेळले नाही. आमच्या संघाला त्या सामन्यांची आवश्यकता नाही. ऑस्ट्रेलियाने 2022च्या डिसेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी जिंकली होती.
भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने शेवटचा कसोटी मालिका विजय ऍडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याच्या नेतृत्वात जिंकली होती. 2004-05 मध्ये झालेल्या त्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया 2-1 असा जिंकली होता. 2017मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने पुणे कसोटी जिंकली होती, तेव्हा ते मालिका जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते. मात्र विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखालील भारताने जबरदस्त पुनरागमन करत मालिका 2-1 अशी जिंकली.
(Andrew McDonald Australia head coach says Practice game not needed before INDvAUS Test Series 2023)
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, 2023
9 ते 13 फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना, नागपूर
17 ते 21 फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना, दिल्ली
1 ते 5 मार्च – तिसरा कसोटी सामना, धरमशाला
9 ते 13 मार्च – चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
17 मार्च – पहिला वनडे सामना, मुंबई
19 मार्च – दुसरा वनडे सामना, विशाखापट्टणम
22 मार्च – तिसरा वनडे सामना, चेन्नई
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अजब कारभार! डीआरएसशिवाय खेळवली जाणार प्रसिद्ध टी20 लीग, कारण तुम्हालाही करेल हैराण
टीम इंडियाला आता सुट्टीच नाही! 2023मध्ये आशिया चषक, वर्ल्डकपसह खेळणार तब्बल ‘इतके’ सामने