ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याची आज (०९ जून) ४७वी जयंती आहे. सायमंड्सचे १४ मे २०२२ रोजी कार अपघातात निधन झाले होते. त्याने १९९८ ते २००९ यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याची कारकीर्द खूपच वादग्रस्त राहिली. यामध्ये २००७-०८मधील हरभजन सिंग याच्यासोबतच्या वादाचाही समावेश आहे. हा वाद क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
मंकीगेट प्रकरण
सन २००७-०८मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील मालिकेचा दुसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळला जात होता. या सामन्यात पंचांकडून खूपच खराब निर्णय घेतले गेल्याचे दिसले होते. या सामन्यादरम्यान जेव्हा हरभजन सिंग (Harbhajan Singh) फलंदाजी करत होता आणि एँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) याच्यासोबत हरभजनची बाचाबाची झाली होती. त्यानंतर कर्णधार रिकी पाँटिंग भडकत त्याने पंचांकडे हरभजनची तक्रार केली होती. पाँटिंगने यावेळी त्याची मर्यादा यासाठी ओलांडली होती. हरभजन सिंग याच्यावर त्याने स्लेजिंगचा नाही, तर वर्णद्वेषाचा गंभीर आरोप लावला होता. तो म्हणाला होता की, हरभजन सिंगने सायमंड्सला मैदानावर ‘मंकी’ म्हणजेच माकड म्हणले होते.
Vale Andrew Symonds.
We are shocked and saddened by the loss of the loveable Queenslander, who has tragically passed away at the age of 46. pic.twitter.com/ZAn8lllskK
— Cricket Australia (@CricketAus) May 15, 2022
वर्णद्वेषी वक्तव्य करणे मोठा आरोप
आयसीसीच्या नियमांनुसार वर्णद्वेषी वक्तव्य करणे खूप मोठा आरोप आहे. कोणत्याही प्रकारचे वर्णद्वेषी वक्तव्य हे ‘लेव्हल तीन’चा गुन्हा मानला जातो. यामध्ये खेळाडूंवर दोन किंवा चार कसोटी सामन्यांची बंदी लागू शकते. दिवसाचा खेळ संपल्यानंतर सुनावणी मध्य रात्रीपर्यत चालली आणि हरभजन सिंगला दोषी ठरवत ३ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मात्र, खरा वाद यानंतर सुरू झाला होता. संपूर्ण भारतीय संघ आणि कर्णधार अनिल कुंबळे या वादात हरभजनची साथ देत होते. तसेच, त्यांनी हे स्पष्ट केले होते की, ते तोपर्यंत पुढील सामना खेळणार नाहीत, जोपर्यंत हरभजनवर लागलेला वर्णद्वेषी वक्तव्याचा आरोप मागे घेतला जात नाही.
हेही पाहा- धडाकेबाज क्रिकेटपटू तरीही दारूडा म्हणून ओळखला जाणारा ऍण्ड्रू सायमंड्स
हे वाढते प्रकरण पाहून आयसीसीने याची सुनावणी न्यूझीलंडचे न्यायाधीश जॉन हॅन्सन यांच्याकडे सोपवली. हॅन्सन यांनी प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हरभजनवर असलेले सर्व आरोप आधारहीन असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी सांगितले की, “हरभजनने सायमंड्सला ‘मंकी’ नाही तर वेगळेच काहीतरी म्हणले आहे.” त्यामुळे या वादाला मंकीगेट वाद म्हणतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
सायमंड्सची क्रिकेट कारकीर्द
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा समावेश सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होतो. त्याने ऑस्ट्रेलियाकडून २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले. या धावा करताना त्याने वनडेत १४६२ धावा, कसोटीत ५०८८ धावा आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३३७ धावा चोपल्या होत्या. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याने कसोटीत २४ विकेट्स, वनडेत १३३ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८ विकेट्स घेतल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ऑस्ट्रेलियाच्या महान अष्टपैलू क्रिकेटरचा कार अपघातात मृत्यू, क्रिकेटविश्वावर शोककळा
टीम इंडियाबरोबर झालेल्या ‘त्या’ वादामुळे दारुडा झाल्याचे सायमंडने केले होते आरोप
दारु पिणे किती महागात पडू शकते, याची ५ क्रिकेटमधील उदाहरणे