---Advertisement---

टीम इंडियाबरोबर झालेल्या ‘त्या’ वादामुळे दारुडा झाल्याचे सायमंडने केले होते आरोप

Andrew-Symonds
---Advertisement---

क्रिकेविश्वातून मोठी शोकवार्ता पुढे येत आहे. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू एँड्र्यू सायमंड्स याचा शनिवारी (१४ मे) कार अपघातात मृत्यू झाला आहे. तो ४६ वर्षांचा होता. या धक्कादायक वृत्तानंतर क्रिकेटविश्व शोकसागरात बुडाले आहे. वर्षभरात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने दिग्गज क्रिकेटपटूला गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. सायमंड्सपूर्वी रॉड मार्श आणि शेन वॉर्न या ऑस्ट्रेलियन दिग्गजांचे निधन झाले आहे. 

२०१८मध्ये सायमंडने आपण दारुडा का झालो हे सांगितले होते. तसेच पुन्हा एकदा ‘मंकीगेट’ प्रकरण उकरून काढले होते. या प्रकरणाला सुमारे बारा वर्षे झाली असली तरी सायमंड्सबद्दलचा तो एक न विसरण्याजोगा किस्सा बनला आहे.

“भारतासोबत झालेल्या ‘मंकीगेट’ प्रकरणाने मी मद्यपानाच्या आहारी गेलो. यामुळे माझ्या क्रिकेटच्या  कारकिर्दीला मोठे नुकसान झाले”, असे सायमंड्स म्हणाला होता.

भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने मला ‘मंकी’ म्हटले होते, असा आरोप सायमंड्सने केला होता. ही घटना 2008मध्ये सिडनी कसोटी सामन्या दरम्यान झाली होती. पण हरभजनने या आरोपांचा स्विकार केला नव्हता. तसेच भारतीय संघाने तो दौरा अर्धवट सोडण्याचा विचारही  केला होता.

या सर्व प्रकारामुळे सायमंड्सने त्याला कशाप्रकारे पुढील जीवनात अडचणी आल्या हे सांगितले होते.

“त्या घटनेपासून माझी कारकीर्द माझ्यासमोर संपत चालली होती. म्हणून मी मोठ्या प्रमाणावर मद्यपान करू लागलो. यामुळे माझे आयुष्यच अवघड होऊन बसले”, असे सायमंड्सने ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

“या प्रकरणात मी माझ्या संघसहकाऱ्यांना ओढावून घेतल्याचे मला दु:ख होत आहे. पण मी कुठे चुकलो हे आम्हाला कळलेच नाही”,असेही तो म्हणाला होता.

“भारतात झालेल्या मालिकेदरम्यान मी हरभजनशी बोललो होतो. त्यावेळीही तो मला मंकी म्हणाला असे कबूल केले होते. नंतर मी त्याला म्हटले की जर त्याने मला अशी नावे ठेवण बंद नाही केले तर हे प्रकरण हाताबाहेर जाईल.”

ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा सामना सायमंड्सने 2009ला खेळला होता. पण एक महिन्यानंतर वर्ल्ड टी-20मध्ये त्याने मद्यपानाशी सबंधित काही नियम तोडल्याने ऑस्ट्रलियन क्रिकेटने त्याचा करार रद्द केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

आंद्रे रसेलच्या ‘वादळा’पुढे सनरायझर्स हैदराबाद उडाले, ऐतिहासिक कामगिरी करत पोलार्ड-गेलला मागे सोडले

आंद्रे रसेलचा हैदराबादविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, कोलकाताने ५४ धावांनी जिंकली रोमांचक लढत

शशांकने अडवला रहाणेचा सिक्स, बाउंड्री लाईनवर घेतला अनपेक्षित झेल; पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारा कॅच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment