वॉशिंग्टन (सीटी) ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या अॅंडी मरेने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचा हा सामना ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनॉर विरुद्ध आज (4ऑगस्ट) होणार होता.
तसेच 3 ऑगस्टला झालेल्या सामन्यात मरेने रोमानियन टेनिसपटू मारीअस कोपीलला 6-7 (5/7), 6-3, 7-6 (7/4) असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
पहाटे 3 वाजेपर्यंत चाललेल्या या सामन्यात मरे रडकुंडीला आला होता. तब्बल तीन तास चाललेल्या हा सामना संपल्यावर मरे बाकावर बसून काही वेळ रडला सुद्धा होता.
मरेने याआधी 2017च्या युएस ओपनमधून दुखापतीमुळे माघार घेतली होती. सीटी ओपनमध्ये त्याने 11 महिन्यानंतर पुनरागमन करताना तीनही सामने तीन सेटमध्येच जिंकले आहेत. हे सगळे सामने जवळ-जवळ 2 तास 30 मिनिटे चालले होते.
सध्या सुरू असलेल्या सीटी ओपनमधून त्याने माघार घेतली तर आहेच. पण टोरंटो मास्टर्समध्येही तो खेळणार नाही हे मरेने घोषित केले आहे.
It's been an honor to be a part of your comeback journey, @andy_murray!
Wishing you a speedy recovery.
Whatever it takes, we know you'll rise stronger than ever.#CO50 https://t.co/fPrHUCzRgD— Mubadala Citi DC Open (@mubadalacitidc) August 3, 2018
“पहाटे तीन वाजता सामना संपणे हे कोणत्याही खेळाडूसाठी योग्य नाही. चाहत्यांसाठी तर मुळीच बरोबर नाही”,असे मरे म्हणाला होता.
“तीन वाजता सामना सपंल्यावर बाकीच्या वस्तू घेऊन जाण्यासाठी कमीक कमी सकाळचे 6 तरी वाजतील. त्यानंतर खूप वेळ झोप घेण्याचा मी विचार करत असून ती कोणत्याही खेळाडूंसाठी आवश्यकच आहे. एवढा वेळ सामना खेळल्यावर असे वाटत आहे, मी एकाच दिवसात दोन सामने खेळलो”, असे मरे पुढे म्हणाला.
“हा खुप मोठा दिवस आणि सामना यामुळे मी थोडा फार भावूक झालो.”
⚠️☔️ Due to the weather, all action will resume tomorrow.
Gates open at 11 AM; matches start at 12:00 P.
Updated order of play to be shared soon. #CO50— Mubadala Citi DC Open (@mubadalacitidc) August 4, 2018
पावसामुळे या स्पर्धेतील काही टेनिसपटूंना गुरूवारी एकाच दिवशी दोन सामने खेळावे लागले होते. तर आजच्याही सामन्यांना उशीर झाला आहे.
जागतिक क्रमवारीत 832व्या स्थानावर असणारा हा 31वर्षीय टेनिसपटू सध्या 13 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सिनसिनाटी ओपनसाठी तयारी करत आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–कसोटी मालिका बोरिंग ठरली असती परंतु विराटच्या त्या गोष्टीमुळे आता येणार मजा
–टाॅप ५- इशांत शर्मा सुसाट, एकाच सामन्यात केले अनेक विक्रम