श्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला पोटरीच्या दुखापतीमुळे ६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या डे नाईट मालिकेतून बाहेर पडला आहे.
श्रीलंका संघाने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या संघाला या सामन्यात पुन्हा एकदा या दिग्गज अष्टपैलूच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहे.ही तिसरी अशी मालिका सलग मालिका आहे ज्यात अँजेलो मॅथ्यूजचा एकही सामन्यात सहभाग असणार नाही.
अँजेलो मॅथ्यूज गेल्या वर्षभरात अतिशय कमी सामने खेळला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुखापतग्रस्त झाल्यापासून तो संघात पूर्णवेळ सहभागी होऊ शकलेला नाही.