पुणे । पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत ड्रसाज प्रकारात अनिकेत हलभावी व अनिरुद्ध मोहिरे यांना संयुक्तपणे सुवर्णपदक देण्यात आले.
दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्नल सरप्रताप सिंग (निवृत्त), कर्नल संजय बोरसे (निवृत्त), शेखर मुंदडा, प्रमोद मोहिते, डॉ.गुलविंदरसिंग, डॉ.अविजान सिन्हा, स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनचे सेक्रेटरी आणि मुख्य संयोजक गुणेश पुरंदरे, विनायक हळबे आदी उपस्थित होते.
अकलूज, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध भागांतून राज्यभरातील ९ संघातून १६० खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा चार प्रकारांत ही स्पर्धा होत आहे.
उद्घाटन सोहळ्यादरम्यान अश्वारोहणातील शो-जंपिंग, टेंट पेगिंग यांसह चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.
ड्रसाज प्रकारात अनिकेत हलभावी (१४७.५० गुण), अनिरुद्ध मोहिरे (१४७.५० गुण), मुकुंद राणे (१०६.५० गुण) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर, शो जंपिंग कन्फाईंड प्रकारात गंधार पोतदार (४६.२९ से.) प्रथम, रोहित थोरात (७३.४०से.) द्वितीय क्रमांक पटकाविला.
इतर निकाल
हॅक्स : वयोगट १० ते १२ वर्षे – आशिष डांगे (प्रथम), अलिशा मोरे (द्वितीय), आयशा मोरे (तृतीय), वयोगट १२ ते १८ वर्षे – शिवराज माने (प्रथम), वेदांत कदम (द्वितीय), रुहान अग्रवाल (तृतीय), ज्युनियर गट – अनिरुद्ध मोहिरे (प्रथम), रोहित थोरात (द्वितीय), धवलसिंह माने (तृतीय), खुला गट – अॅली घिया (प्रथम), मेघना कुलकर्णी (द्वितीय), आर्या ठाकूर (तृतीय).