सनराइजर्स हैदराबाद संघाचा खेळाडू अनिकेत वर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शानदार पारी खेळली. त्याने त्याच्या आयपीएल करिअरमधील पहिलं अर्धशतक केलं आहे. अनिकेतने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तुफानी फलंदाजी करत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. आयपीएल 2025 स्पर्धेतील 10 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात विशाखापटनममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, यादरम्यान अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड ओपनिंग करण्यासाठी आले. त्यानंतर अभिषेक फक्त एका धावेवर बाद झाला. तसेच हेडने 12 चेंडूत 22 धावा केल्या. संघासाठी अनिकेत पाचव्या नंबर वर फलंदाजी करण्यासाठी आला, त्याने 41 चेंडूत 74 धावा केल्या. अनिकेतने यादरम्यान 5 चौकार आणि 6 षटकार झळकावले.
हैदराबादचा खेळाडू अनिकेतने याच वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. त्याने पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला. अनिकेतला आयपीएलच्या मेगा लिलावात हैदराबादने 30 लाख रुपयांना खरेदी केले होते. आजच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आयपीएल करिअरचं पहिलं अर्धशतक केल आहे. अनिकेतने लखनऊ विरुद्ध सुद्धा चांगली फलंदाजी केली होती, त्याने 36 धावा केल्या होत्या.






