महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशियशनच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समितीवर महाराष्ट्र राज्याचे पंच अनिल भोईर यांची निवड झाली आहे. ही निवड २०१९ ते २०२३ या काळासाठी असेल. याबद्दलचे पत्र त्यांना राज्य संघटनेकडून मिळाले आहे.
२० जून रोजी महाराष्ट्र राज्य संघटनेची बैठक मुंबई येथे झाली. यावेळी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या. यावेळी भोईर यांची या समितीवर निवड करण्यात आली. या समितीचे प्रमुख म्हणून शशिकांत राऊत काम पहाणार आहेत.
२३ वर्षीय अनिल भोईर हे या प्रसिद्धी आणि प्रकाशन समितीवर निवड झालेले आतापर्यंतचे सर्वात तरुण सदस्य आहेत. महाराष्ट्र कबड्डी असोशियनशी पंच तसेच आकडेवारी तज्ञ म्हणून भोईर गेले तीन वर्ष जोडले गेले आहेत.
तसेच त्यांनी पत्रकार म्हणूनही राज्य संघटनेची मान्यता असलेल्या अनेक स्पर्धांना हजेरी लावलेली आहे. भोईर हे महा स्पोर्ट्सचे नियमीत लेखक असून खेल कबड्डीच्या तीन संस्थांपकांपैकी एक सहसंस्थापक आहेत.
जानेवारी २०१७मध्ये झालेल्या मुंबई शहर पंच परिक्षेत भोईर हे पहिले आले होते. तसेच ऑक्टोबर २०१७मध्ये राज्याची पंच परीक्षाही पास झाले आहेत.
यावेळी अनिल भोईर म्हणाले, कबड्डी क्षेत्रात जेव्हा पाऊल ठेवले तेव्हा मला मनोहर इंदुलकर सरांचे मार्गदर्शन मिळाले तर शशिकांत राऊत सरांनी बातम्या प्रसिद्धीचे काम करण्याची संधी दिली तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले. रवींद्र देसाई सरांनी असोसिएशनमध्ये काम करण्याची संधी दिली. महा स्पोर्ट्सच्या टीमने मला वेळोवेळी जी मदत केली यासाठी त्यांचे मनापासून आभार. यापुढे महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी नक्कीच चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एकवेळ या क्रिकेटपटूसाठी भांडला होता गंभीर, आता त्याला मिळाली टीम इंडियात संधी
–तो क्रिकेटमधील सोनेरी दिवस ना लंकेचे चाहते विसरले ना भारतीय फॅन…
–नवदीप सैनी, राहुल चहर पाठोपाठ पुण्याचा हा युवा क्रिकेटपटूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार