---Advertisement---

तयारी जोमात! भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती

On: शुक्रवार, जानेवारी 29, 2021 11:11 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यास अवघ्या एका आठवड्याचा कालावधी उरला आहे. त्या अनुशंगाने दोन्ही संघानी आणि क्रिकेट बोर्डांनी तयारी सुरू केली आहे. अशात गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी पंचांची घोषणा केली आहे. यात आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंच नितिन मेनन यांचा समावेश आहे. त्यांच्याव्यतिरिक्त दोन नव्या पंचांचे या सामन्यांद्वारे पदार्पण होणार आहे.

प्रसिद्ध क्रिकेट वेबसाइट क्रिकबझमधील वृत्तानुसार, मेनन यांच्याव्यतिरिक्त अनिल चौधरी आणि विरेंद्र शर्मा यांची चेन्नईतील कसोटी सामन्यांत निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.

५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात मेनन यांच्याबरोबर चौधरी पंचगिरी करताना दिसणार आहेत. तर १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शर्मा यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटपटू जवागल श्रीनाथ हे या दोन्ही सामन्यांचे रेफरी असतील. हे दोन्ही सामने चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

इंग्लंड संघ पोहोचला चेन्नईत

काही दिवसांपुर्वीच श्रीलंका दौरा आटोपून पाहुण्या इंग्लंड संघाचे भारतात आगमन झाले आहे. तसेच भारतीय संघाचे खेळाडूही चेन्नईत पोहोचले आहेत. या दोन्ही संघांना चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सहा दिवसांच्या विलगीकरण कालावधीनंतर हे दोन्ही संघ सरावास सुरुवात करतील.

लवकरच भिडणार भारत-इंग्लंड संघ 

इंग्लंडच्या भारत दौऱ्यात दोन्ही संघात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. यजमान भारत आणि पाहुणा इंग्लंड संघ विजयरथावर स्वार असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ च्या फराकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने श्रीलंकाला २-० ने क्लिन स्विप केले आहे. अशात ही कसोटी मालिका अतिशय अतीतटीची होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक

जसप्रीत बुमराह विरुद्ध रणनीती आखणे महाकठीण; इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सची प्रतिक्रिया

मोबाईल आहे ना, मग चिंता नाही! टिव्हीवर नाही पण ‘या’ ऍपद्वारे पाहता येणार भारत-इंग्लंड सामने?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---