कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यामुळे ४ वर्षांपूर्वी आपले पद सोडणारे अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे. अशा परिस्थितीत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कुंबळेला मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते.
कुंबळे २०१६-२०१७ मध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गांगुली यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची शास्त्रींच्या जागी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कोहलीशी त्यांचे मतभेद समोर आले. यानंतर कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला.
आणखी एक दिग्गज शर्यतीत
कुंबळे व्यतिरिक्त, बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादशी संबंधित असलेला भारतीय दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणशी संपर्क साधू शकते. असे असूनही, कुंबळे प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार राहतील. या पदासाठी बीसीसीआयची पहिली पसंती भारतीय प्रशिक्षक आहेत. कुंबळे यांना भारतीय संघाच्या प्रशिक्षकाव्यतिरिक्त आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स या संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा अनुभव आहे.
असा राहिलेला पहिला कार्यकाळ
कुंबळे २३ जून २०१६ रोजी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक झालेले. भारतीय संघाचे प्रशिक्षक बनताच अनिल कुंबळेंच्या मार्गदर्शनात भारताने वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. यानंतर घरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने विजय मिळवलेला. त्याचबरोबर वनडे मालिकेतही भारताने न्यूझीलंडचा ३-२ ने पराभव केलेला. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतही भारताने ४-० अशी सरशी साधलेली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी२० मालिका २-१ ने जिंकलेली.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा केवळ २ धावांवर बाद होऊनही गांगुलीने जिंकलेला ‘सामनावीर’ पुरस्कार, पाकिस्तानची उडवली होती झोप
श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरने बीसीसीआय दिलेली प्रशिक्षक पदाची ऑफर धुडकावली
दहशतवादी हल्ल्यांमुळे क्रिकेटवर परिणाम झाल्याच्या ५ घटना; पाकिस्तान राहिलाय केंद्रबिंदू