---Advertisement---

प्लेऑफमध्ये या 4 संघांना क्वालिफाय होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, अनिल कुंबलेची भविष्यवाणी

---Advertisement---

आयपीएल 2025 मध्ये सर्व संघांचे 9- 9 सामने खेळले गेले आहेत. त्याचबरोबर आता प्रत्येक संघाचे हंगामातील पाच ते सहा सामने उरले आहेत आयपीएलचा हंगाम प्लेऑफच्या दिशेने पुढे जात आहे आणि हळूहळू प्लेऑफमध्ये पोहोचणारे संघ समोर येत आहेत. प्लेऑफच्या या संघांची नावे अंतिम सामन्याआधी माजी भारतीय क्रिकेट खेळाडू अनिल कुंबळे यांनी एक भविष्यवाणी केली आहे. या भविष्यवाणी मध्ये त्यांनी चार संघांची नावे सांगितली आहेत, जे संघ प्लेऑफ मध्ये पोहोचू शकतात.

अनिल कुंबळे यांच्या अनुसार जो पहिला संघ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करू शकतो, तो म्हणजे गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये टॉपच्या स्थानी आहे. गुजरातने 8 मधील 6 सामने जिंकले आहेत. या संघाला फक्त 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्लेऑफमध्ये जाणारा दुसरा संघ दिल्ली कॅपिटल्स आहे, जो पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीने सुद्धा 8 मधील 6 सामने जिंकले आहेत.

त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आयपीएल हंगामातील तिसऱ्या स्थानावर राहणारा संघ आहे. तसेच मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. मुंबईची हंगामात सुरुवात झाली खराब झाली तरी आता मुंबईने सलग चार विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने पावले टाकली आहेत. मुंबईने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत ज्यामध्ये 5 पराभव पत्करले आहेत.

अनिल कुंबळे यांच्या अनुसार प्लेऑफमध्ये जाणारा चौथा संघ पंजाब किंग्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असू शकतो. आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तसेच आरसीबीने 9 मधील 6 सामने जिंकले आहेत आणि 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच पंजाबने 9 मधील 5 सामने जिंकले आहेत. तसेच त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---