यंदाच्या आयपीएल हंगामातील 46वा सामना रविवारी (27 एप्रिल) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) संघात खेळला जाईल. त्यासाठी दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आमने-सामने असतील. या सामन्यात भारतीय संघाचे दोन सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) खेळताना दिसतील. (10 एप्रिल) रोजी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, त्यावेळी राहुलने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शानदार फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) उत्तम फॉर्ममध्ये आहे. 9 डावांमध्ये 5 अर्धशतकांसह 392 धावा करणारा कोहली आपल्या नावावर एक मोठा स्पर्धेचा रेकाॅर्ड करू शकतो. आरसीबीचा संघ या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धही सामना खेळेल. कोहली त्या सामन्याचा बदला घेण्याबरोबरच एक मोठा रेकाॅर्ड मोडण्याचा प्रयत्न करेल.
कोहलीच्या निशाण्यावर आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड आहे. तो हा रेकाॅर्ड मोडण्यापासून फक्त 31 धावा दूर आहे. सध्या हा रेकाॅर्ड डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नावावर आहे, ज्याने पंजाब किंग्जविरुद्ध 26 डावात 1,134 धावा केल्या आहेत. विराटने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 29 सामन्यात 1,079 धावा केल्या आहेत. जर त्याने दिल्लीत 31 धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.
आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
1,134 धावा – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पंजाब किंग्ज (26 डाव)
1,104 धावा – विराट कोहली विरुद्ध पंजाब किंग्ज (34 डाव)
1,093 धावा – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (28 डाव)
1,084 धावा – विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (33 डाव)
1,083 धावा – रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (35 डाव)
1,079 धावा – विराट कोहली विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (29 डाव)






