पुणे, 3 जानेवारी, 2024: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत दसॉल्ट सिस्टीम, सायबेज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अविरल सैनी(23धावा व 2-22) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दसॉल्ट सिस्टीम संघाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने 20 षटकात 7बाद 131धावा केल्या. यात साईनाथ शिंदे 51, विक्रांत बांगर 15, तुषार आत्तर्डे 15, प्रवीण इंगळे 11 यांनी धावा केल्या. दसॉल्ट सिस्टीमकडून भूषण पाटील(2-25), अविरल सैनी(2-22), सुयश मालवीया(1-6) यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान दसॉल्ट सिस्टीम संघाने 18.1 षटकात 6बाद 133धावा करून पूर्ण केले. यात पीयूष सावंत 27, संग्राम पाटील 23, अविरल सैनी 23, गौरव सिंग 18, भूषण पाटील 17 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर अविरल सैनी ठरला.
दुसऱ्या सामन्यात शुभम खिंद्रे(नाबाद 13 व 3-14)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सायबेज संघाने पबमॅटिक संघाचा 34 धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली.
संक्षिप्त धावफलक: साखळी फेरी:
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: 20 षटकात 7बाद 131धावा(साईनाथ शिंदे 51(50,3×4,1×6), विक्रांत बांगर 15, तुषार आत्तर्डे 15, प्रवीण इंगळे 11, भूषण पाटील 2-25, अविरल सैनी 2-22, सुयश मालवीय 1-6)पराभुत वि.दसॉल्ट सिस्टीम: 18.1 षटकात 6बाद 133धावा(पीयूष सावंत 27, संग्राम पाटील 23, अविरल सैनी 23, गौरव सिंग 18, भूषण पाटील 17, दीपक शर्मा 1-14, विक्रांत बेंगर 1-20); सामनावीर -अविरल सैनी; दसॉल्ट सिस्टीम संघ 4 गडी राखून विजयी;
सायबेज: 20 षटकात 7बाद 144धावा(अविनाश माळी 31(33,3×4), रोहित देवगावकर 40(21,6×4,1×6), कुणाल रावल नाबाद 15, शुभम खिंद्रे नाबाद 13, राहुल पवार 2-32, सुमेध कांबळे 2- 17)वि.वि.पबमॅटिक: 18.1 षटकात सर्वबाद 110धावा(अमित जोशी 17, त्रिशल पुजारी 17, ज्ञान रौनक 16, शुभम खिंद्रे 3-14, अर्पित थोरात 2-20); सामनावीर – शुभम खिंद्रे; सायबेज संघ 34 धावांनी विजयी.