आयसीसीने जानेवारी महिन्यातील ‘प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC player of the month) निवडण्यासाठी खेळाडूंची घोषणा केली आहे. पुरुष खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना निवडण्यात आले आहे. १९ वर्षाखालील संघातील (U19 team south Africa) डेवाल्ड ब्रेविस, दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कीगन पीटरसन आणि बांगलदेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन यांचा समावेश करण्यात आला आहे. महिलांमध्ये श्रीलंकेची चमारी अटापटू, वेस्ट इंडिजची डायंड्रा डॉटिन व इंग्लंडची हीदर नाइट यांचा समावेश करण्यात आला आहे. मतदान प्रक्रियेनंतर विजेत्यांची घोषणा केली जाईल.
अष्टपैलू डेवाल्ड ब्रेविसने नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याला बेबी एबी अस सुद्धा म्हटले जात आहे. कारण तो एबी डीविलियर्ससारखी फलंदाजी करतो. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ब्रेविसने ६ सामन्यांमध्ये ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच उत्तम गोलंदाजी करत एकूण ७ गडी बाद केले आहेत. त्याला स्पर्धेत सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका भारताने २-१ अशी गमावली. यामध्ये कीगन पीटरसनने संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भुमिका निभावली होती आणि त्याने त्या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. मालिकेत तिसऱ्या स्थानी फलंदाजी करत त्याने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये ६१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या होत्या. तसेच शेवटच्या सामन्याच्या चौथ्या डावात त्याने ८२ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकता आला होता. मालिकेतील चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.
बांगलदेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन याचा सुद्धा सामावेश प्लेयर ऑफ द मंथमध्ये करण्यात आाला आहे. न्युझीलंड दौऱ्यावर त्याने शानदार प्रदर्शन केले होते. पहिल्या कसोटी सामन्यात महत्त्वपुर्ण योगदान दिले होते. दोन सामन्यांच्या मालिकेत त्याने ९ विकेट घेतल्या होत्या. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात इबादतने ६ विकेट घेत ४६ धावा देत विजयात महत्त्वाची भुमिका बजावली होती. तसेच सामन्यात ७ विकेट्स घेतल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलेले.
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेटपटूने टिपला जॉंटी रोड्स स्टाईल एकहाती झेल, पाहा व्हिडिओ (mahasports.in)
U19 विश्वचषक गाजवल्यानंतरही ‘त्या’ दोघा दुर्दैवी गोलंदाजांची कारकीर्द बहरलीच नाही (mahasports.in)