बर्मिंघम येथे सुरू असलेल्या २२व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या हंगामात भारतासाठी ७ ऑगस्ट दिवस जबरदस्त ठरत आहे. भारताच्या अन्नू रानीने महिलांच्या भालाफेकीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. याबरोबरच भारताच्या ऍथलेटिक्समध्ये आणखी एका पदकाची भर पडली आहे. अन्नूने ६० मीटर थ्रो करत तिसरे स्थान गाठले. यावेळी सुवर्ण आणि रौप्य ऑस्ट्रेलियाने जिंकले.
अन्नू राणीने रचला इतिहास
अन्नू राणी (Annu Rani) हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ६० मीटर थ्रो केला होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये ती पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय भालाफेकीपटू बनली आहे. तिने २०१४च्या एशियन गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या केलसे ली बार्बरने ६४.४३ मीटर थ्रो करत सुवर्ण जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्याच मॅकेजी लिटिलने ६४.२७ मीटरचा थ्रो करत दुसरे स्थान गाठले.
Medals continue for Team 🇮🇳 in athletics ! @Annu_Javelin secures the 🥉in the Women's Javelin Throw at @birminghamcg22 #EkIndiaTeamIndia #WeAreTeamIndia pic.twitter.com/9BcmB3J83J
— Team India (@WeAreTeamIndia) August 7, 2022
भारताची भालाफेकीतील कामगिरी
राणीच्या आधी काशीनाथ नायक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने पुरुषांच्या भालाफेकीत पदके जिंकली आहेत. नायकने दिल्ली झालेल्या २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य आणि नीरजने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या २०१८ कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. तर नीरजने यंदाच्या स्पर्धतून माघार घेतल्याने भारताला या क्रिडा प्रकारातील पदकाची आशा नव्हती. मात्र राणीने प्रभावशाली कामगिरी करत पदक जिंकले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
CWG: भारताचे टेबल टेनिसमधील गोल्ड हुकले; शरथ-साथियानचा थोडक्यात पराभव
‘ते लांब आणि कंटाळवाणे आहे म्हणून..’ इंग्लंडच्या दिग्गजाने वनडे क्रिकेटच्या भविष्यावर व्यक्त केले मत
अर्शदीप सिंगला टी२० विश्वचषकासाठी संघात घ्याच! माजी प्रशिक्षक शास्त्री गुरूजींचा टीम इंडियाला सल्ला