भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करतो आहे. अगदी मायदेशातही त्याला चांगली खेळी करता आलेली नाही. असे असले तरीही, त्याने गेल्या काही दिवसांत बरेचसे विक्रम आपल्या खात्यात जोडले आहेत. आता असाच अजून एक नवा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. विराट वनडे क्रिकेटमधील पहिल्या २५० डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज (Most Runs In 250 ODI Inning) बनला आहे. त्याने हा पराक्रम वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान केला आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात बुधवारी (०९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथे ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना (Second ODI) पार पडला. भारतीय संघाने ४४ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
गांगुली, तेंडूलकरच्या गेला पुढे
भारताचा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज विराट याचा हा वनडे कारकिर्दीतील २५९ वा सामना होता. तर या २५९ वनडे सामन्यांमध्ये फलंदाजी करायला मिळण्याची ही २५० वी वेळ (२५० वा डाव) होती. या डावात तो ३० चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने १८ धावा करून बाद झाला. परंतु या छोटेखानी खेळीसह त्याने वनडेतील १२३११ धावांचा पल्ला गाठला. या कोणत्या फलंदाजाने वनडेतील पहिल्या २५० डावांमध्ये केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.
पहिल्या २५० वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात विराटनंतर सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीसीसीआयच्या या विद्यमान अध्यक्षाने त्याच्या पहिल्या २५० डावांमध्ये ९६०९ धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडूलकर (९६०९ धावा), वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा (९३५४ धावा), एमएस धोनी (९३३८ धावा) हे टॉप-५ मध्ये आहेत.
विराटचे भारतात १०० वनडे
याव्यतिरिक्त विराटने दुसऱ्या वनडेसाठी मैदानावर उतरताच मोठा विक्रम केला होता. विराटसाठी हा भारतात खेळलेला १०० वा वनडे सामना होता. भारतात १०० वनडे सामने खेळण्याचा टप्पा पार करणारा तो एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर (१६४), एमएस धोनी (१३०), मोहम्मद अझरुद्दीन (११३) आणि युवराज सिंग (१११) यांनी असा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
देने वाला जब भी देता,देता छप्पर फाड के, अंडर १९ WC नंतर यश धूल साठी आणखी एक आनंदाची बातमी
“यावेळी माझ्यावर बोली लागणार”; युवा अफगाणी फलंदाजाने व्यक्त केला विश्वास