केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला पाठोपाठ कागिसो रबडाही बाद झाला आहे. त्याला मोहम्मद शमीने कर्णधार कोहलीकडे झेल द्यायला भाग पाडले.
जेव्हा रबाडा ३३ चेंडूत ५ धावांवर बाद झाला तेव्हा कर्णधार कोहलीची देहबोली ही आम्ही ही कसोटी जिंकण्यासाठीच खेळत आहे अशीच काहीशी होती. रबाडा या सामन्यात नाईट वॉचमॅन म्हणून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात फलंदाजीला आला होता.
तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेल्यानंतर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ २ बाद ६५वरून पुढे सुरु झाला. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या षटकात कोणतीही धाव काढण्यात आफ्रिकेच्या खेळाडूंना यश आले नाही. परंतु पुढच्याच षटकात मोहम्मद शमीने हाशिम अमलाला रोहित शर्माकडे झेल द्यायला भाग पाडले होते.
सद्यस्थितीत आफ्रिकेकडे १५९ धावांची आघाडी असून सध्या एबी डिव्हिलिअर्स १४ तर कर्णधार फाफ डुप्लेसी० धावांवर खेळत आहे.
WICKET | Shami strikes again and this time its the wicket of Rabada (5) who is caught by Kohli at second slip. SA 73/4 #SAVIND pic.twitter.com/JIUQfqNJCq
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 8, 2018