ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (27 ऑक्टोबर) पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (SAvBAN) असा खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रायली रुसो (Rilee Rossouw) याने धमाकेदार शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिका मोठी धावसंख्या रचून दिली. या धावांच्या प्रतिउत्तरात पहिल्या षटकात चांगली सुरुवात करूनही बांगलादेशला दुसऱ्या षटकात एन्रिक नॉर्किएने दोन धक्के देत आपल्या संघाला पुनरागमन करून दिले.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार बवुमा केवळ दोन धावा काढून पहिल्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर डी कॉक व रुसो यांनी धावगती अजिबात कमी न होऊ देता 85 चेंडूवर 168 धावा काढल्या. डी कॉकने 68 धावांचे योगदान दिले. रूसो शतक करून बाद झाला. मात्र, अखेरच्या चार षटकात बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेला 205 धावांवर रोखले.
https://www.instagram.com/reel/CkNKrevJ0-N/?igshid=YmMyMTA2M2Y=
या धावांचा पाठलाग करताना नजमुल शांतो व सौम्या सरकार यांनी पहिल्याच षटकात कगिसो रबाडाला एक चौकार व 2 षटकार मारत 19 धावा लुटल्या. मात्र, दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) याने पहिल्याच चेंडूवर सरकारला डी कॉकच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. तर, त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने शांतो याचा त्रिफळा उडवला. आपल्या पुढच्या षटकातही त्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला पाहिजेत करत बांगलादेशला सामन्यातून पूर्णतः बाहेर गेले. आपल्या पहिल्या दोन षटकांच्या स्पेलमध्ये त्याने केवळ चार धावा देताना तीन फलंदाजांना माघारी पाठवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा
भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम