पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होऊ घातलेल्या दक्षिण आफ्रिका टी२० लीगची लगबग चांगलीच सुरू आहे. स्पर्धेतील सर्व सहा संघ आयपीएलच्या संघमालकांनी विकत घेतलेत. आयोजकांनी या स्पर्धेसाठी ३० मार्की खेळाडूंची निवड केली असून, सर्व संघ आपापल्या संघात प्रथमता पाच खेळाडू निवडू शकतात. केप टाऊन, डर्बन व पार्ल फ्रॅंचाईजीने आपल्या सुरुवातीच्या खेळाडूंची घोषणा केल्यानंतर आता प्रिटोरिया फ्रॅंचायजीने सुरुवातीला अवघ्या दोन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही नवी कोरी लीग आयोजित करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी आता संघमालकांची तयारी सुरू झालीये. मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय केपटाऊन संघाने लियाम लिव्हिंगस्टोन, राशिद खान, कगिसो रबाडा, सॅम करन व डेवाल्ड ब्रेविस यांना करारबद्ध केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या मालकीच्या पार्ल रॉयल्सने जोस बटलर, डेव्हिड मिलर, ओबेद मेकॉय व कॉर्बिन बॉश तर, लखनऊ सुपरजायंट्सच्या डरबन फ्रॅंचायजीने क्विंटन डी कॉक, जेसन होल्डर, कायले मायर्स, रिस टोप्ली व प्रेनेलन सुब्रायन यांना आपल्या संघात अंतिम केले आहे.
त्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सच्या मालकीच्या प्रिटोरिया कॅपिटल्सने दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए व युवा क्रिकेटपटू मिग्युएल प्रिटोरियस यांना करारबद्ध करत असल्याची घोषणा केली. ते आता आणखी तीन विदेशी खेळाडूंना आपल्या संघात लिलावापूर्वी स्थान देऊ शकतात.
वरील चार संघांव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादने पोर्ट एलिझाबेथ फ्रॅंचाईजी तर चेन्नई सुपर किंग्सने जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजी विकत घेतली आहे. पोर्ट एलिझाबेथ फ्रॅंचाईजी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एडेन मार्करला तर जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजी फाफ डू प्लेसिस व मोईन अली यांना आपल्या संघात निवडणार असल्याचे वृत्त माध्यमात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?
द हंड्रेडमध्ये डेविड मलानचा राडा! २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने केल्या तब्बल ‘इतक्या’ धावा




