भारतीय कबड्डीमधील सर्वाधिक वलयंकित खेळाडू, कॅप्टन कूल,बोनस का किंग आणि” द मन हू रन्स धिस प्लेस “म्हणून ओळखला जाणाऱ्या अनुप कुमार हा भारतातीलच नव्हे तर पूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. भारतीय कबड्डी संघाला सलग तिसरा विश्वचषक जिंकून देत भारताचा तो यशश्वी कर्णधार बनला.
आपल्या शांत आणि मोक्याच्या वेळी सामना जिंकून देण्याच्या खेळाने तो खूप प्रसिध्द झाला. भारतीय संघाला आणि प्रो कबड्डीमधील त्याचा संघ असणाऱ्या यू मुम्बाला त्याने शेवटच्या काही मिनिटात सामने जिंकून देत कबड्डीतील थरारक शाण्ण दिले आहेत.
अनेक विक्रम आपल्या नावावर असणारा अनुप कुमार या प्रो कबड्डी सीज़न 5मध्ये प्रो कबड्डी मधील काही विक्रम करू शकतो त्यापैकी काही
५००एम्प्टी रेड करणारा पहिला खेळाडू
अनुप ने कित्येकदा मोक्याच्या वेळी पॉईंटस् घेऊन संघाला जिंकून दिले असले तरी आपल्या खेळात त्याने दुसऱ्या मोसमापासून काही बदल केले आहेत आणि बोनस सोबत एम्प्टी रेडचा खूप चांगला उपयोग करत सामने यू मुम्बाच्या बाजूने झुकवले आहेत.शेर अपने पूरे नाखून सिर्फ शिकार के वक्त निकलता है कान खूजाने को नही तसेच काहीसे अनूप कुमारचे आहे. एम्प्टी रेड हे शस्रासारख वापर करणाऱ्या अनुपने प्रो कबड्डी मध्ये आता पर्यंत ४९६ एम्प्टी रेड केल्या आहेत.जर त्याने आणखी ४ एम्प्टी रेड केल्या तर तो ५०० एम्प्टी रेड करणरा पहिला खेळाडू बनेल.त्याचा खेळ पहाता तो हाही विक्रम प्रो कबड्डी पाचव्या मोसमातील यू मुम्बाच्या पहिल्याच सामन्यात करेन असे वाटते.
१००० रेड टाकणारा पहिला खेळाडू बनू शकतो
अनुप कुमार सामन्यात खूप रेड करतो. सामना सुरू असल्यास तुम्ही त्याला विरोधी संघाविरूध्द आपले कसब दाखवण्यावाचून रोखू शकत नाहीत.अनुपने प्रो कबड्डीच्या पहिल्या 4 सीज़नमध्ये मिळून एकूण ९३८ रेड केल्या आहेत जर त्याने आणखी ६२ रेड केल्या तर तो १०००रेड करणारा पहिला खेळाडू बनेल.
.
अनुप कुमारने आजपर्यंत प्रो कबड्डीमध्ये ५७ सामन्यांत ९३८ रेड मारल्या असून, त्यातील फक्त १३५ अयशस्वी रेड आहेत. ३०७ यशस्वी रेड मारलेल्या अनूपने एम्प्टी रेड ४९६ मारल्या आहेत.