भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना कोरोनामुळे तूर्तास रद्द करण्यात आला आहे. यानंतर भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल सामन्यांसाठी नियोजित वेळेच्या आधीच यूएईमध्ये पोहोचले आहेत. आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि त्यांची मुलगी वामिका हे देखील यूएईमध्ये दाखल झाले आहेत.
कोहली कुटुंब भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरही सोबत होते. यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर दुबईच्या हाॅटेलमध्ये अनुष्का आणि विराटचे खास स्वागत करण्यात आले आहे. अनुष्काने या खास स्वागताचे फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.
यापूर्वी विराट आणि मोहम्मद सिराज यांचा फोटो आरसीबीने त्यांच्या ट्विटरवरून पोस्ट करत ते यूएईमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली होती. फोटोत विराट लाईट रंगाचा टी शर्ट आणि ट्राऊजर घातलेला दिसत होता. तसेच सिराज पिवळ्या रंगाच्या हुडीमध्ये आणि डोक्यात काळ्या रंगाची टोपी घातलेला दिसला.
यानंतर विराटच्या पत्नीने चाहत्यांसोबत दुबईतील हाॅटेलमध्ये त्यांचे कशाप्रकारे स्वागत करण्यात आले याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोत दिसत आहे की, हाॅटेल रूममध्ये त्यांच्यासाठी भेटवस्तू ठेवलेल्या आहेत. यावेळी त्यांच्या खोलीत चॉकलेटने भरलेल्या थाळ्याही सजवून ठेवण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर, त्यातील एका थाळीत चक्क चॉकलेटपासून विराटची मुर्ती बनवलेली होती आणि तो आपल्या हातातील बॅटने चॉकलेटला हिट करताना दिसतो.
दरम्यान पाचवा कोसटी सामना रद्द झाल्यानंतर आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या खेळाडूंना यूएईमध्ये आणण्यासाठी स्वतंत्र व्यावस्था केली होती. आरसीबीने त्यांच्या खेळाडूंना आणण्यासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली होती. तपूर्वी आरसीबीने सांगितले होते की, खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी प्राथमिकता आहे. कर्णधार कोहली आणि सिराजला इंग्लंडमधून यूएईला आणण्यासाठी आम्ही चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली आहे.
यूएईत दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंना सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पार करावा लागणार आहे. त्यानंतर कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ते संघासोबत सामील होऊ शकतात. यापूर्वी इंग्लंडवरून आलेले खेळाडू कसल्याही विलगीकरणात ठेवले जाणार नव्हते. पण भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर पाचवा कसोटी सामना दद्द करण्यात आला आणि याचीच खबरदारी म्हणून आता यूएईत खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्वागत आहे! सचिन पोहचला युएईत, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह मुलगा अर्जूनलाही देईल ट्रेनिंग
कुणीतरी येणार गं! सीएसकेचा ‘हा’ खेळाडू लवकरच होणार ‘बापमाणूस’, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज