---Advertisement---

अनुष्काच्या स्वच्छता मोहिमेला विराट कोहलीचा पाठिंबा

On: शनिवार, जून 16, 2018 7:38 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली नेहमी खेळाचे महत्त्व किंवा आरोग्याविषयी जागृकतेचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतो. यावेळीही त्याने पत्नी अनुष्का शर्माच्या स्वच्छता मोहिमेला पाठिंबा देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत अनुष्का कारमध्ये आहे आणि ती दुसऱ्या कारमध्ये असलेल्या व्यक्तीला विचारत आहे की ” तूम्ही रस्त्यावर कचरा का टाकला? थोडी काळजी घ्या. तूम्ही असे प्लॅस्टीक रस्त्यावर फेकू शकत नाही. त्यासाठी डस्बिनचा वापर करा.”

या व्हिडिओ बरोबर विराटने ट्विट केले आहे की ‘बघा हे लोक कचरा रस्त्यावर फेकत आहेत. लक्झरी कारमध्ये प्रवास करत असुनही बुद्धीचा वापर करत नाही. हे लोक आपला देश स्वच्छ ठेवतील?’

‘जर तूम्हाला अशाप्रकारे कोणी चुकीचे करताना आढळले तर अनुष्काने जसे केले तसे करा आणि जागृकता निर्माण करा.’

https://twitter.com/imVkohli/status/1007952358310055937

याआधीही नुष्का आणि विराट हे दोघांनी या पर्यावरणाविषयीच्या जागृकतेसाठी सोशल मिडियाचा आधार घेतला होता.  

महत्त्वाच्या बातम्या:

लोढा समितीची पहिली विकेट; मुंबईकर अजित अागरकर बाद!

आयपीएलने नाकारल म्हणुन काय झालं; डेविड वॉर्नर खेळणार या मोठ्या लीगमध्ये

मुरलीधरन-जयवर्धनेचा श्रीलंकन क्रिकेट मंडळावर जोरदार बाऊंसर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment