क्रिकेटविश्वातील रनमशीन म्हणून प्रचिती मिळवलेल्या विराट कोहली याने गुरुवारी (08 सप्टेंबर) नावाला साजेशी कामगिरी केली आहे. आशिया चषक 2022 मधील अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या भारतीय संघाच्या शेवटच्या सामन्यात त्याने खणखणीत शतक झळकावले आहे. हे विराटचे टी20 कारकिर्दीतील पहिले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक ठरले आहे. तब्बल 1020 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विराटच्या बॅटमधून शतक निघाले आहे.
या खास कामगिरीनंतर क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अगदी विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही खास पोस्ट शेअर करत विराटवर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर विराटचा जल्लोष साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही माध्यमातून नेहमी तुझ्यासोबत राहीन.” या मनाला भावणाऱ्या कॅप्शनसह तिने पुढे हृदयाचा इमोजी जोडला आहे.
https://www.instagram.com/p/CiQWUd7M3S4/?utm_source=ig_web_copy_link
दुसरीकडे विराटने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विराटने या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 122 धावा केल्या. या खेळीसाठी त्याने 6 षटकार आणि 12 चौकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आपली ही खेळी त्याने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका कोहली हिला समर्पित केली. तो म्हणाला की, “मागील दीड वर्षात मी खूप काही शिकलो आहे. येत्या एका महिन्यात मी 34 वर्षांचा होणार आहे. यासाठी हे शतक माझ्यासाठी खूप खास आहे. खरे तर मीच या शतकाने चकित झालो आहे. माझे हे शतक मी अनुष्का आणि वामिकाला समर्पित करतो. त्यांनी मला माझ्या कठीण काळात मानसिकरित्या कसे मजबूत राहायचे, हे शिकवले. त्यांची मला फार मदत झाली.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रिय विराट… पत्रास कारण की…
याला म्हणतात क्रेझ! विराटच्या शतकानंतर कोणी हॉस्टेल तर कोणी केला रस्त्यावर जल्लोष; पाहा व्हिडिओ
घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे






