हिंदी सिनेअभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीला ३३ व्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पती विराट कोहलीसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. अनुष्का शर्माने तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर केवळ एक पोस्टच शेअर केली नाही, तर तिचा विराटसोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने दुबईहून तिच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक लांबलचक संदेश लिहिला आहे, जो खूप खास आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने म्हटले आहे की, तिला जगाला सांगायचे आहे की, विराट किती अद्भुत व्यक्ती आहे.
विराटसोबतचा फोटो शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या फोटोसाठी आणि ज्या पद्धतीने तू तुझे जीवन जगतो त्यासाठी कोणत्याही फिल्टरची गरज नाही. तू मुळात सचोटीने आणि पोलादासारख्या धैर्याने बनलेला आहेस. धैर्य जे संशयाला विस्मृतीत बदलते. तुझ्यासारखा काळोखातून स्वत:ला बाहेर काढणारा कोणी मला माहीत नाही. तू प्रत्येक प्रकारे उत्कृष्ट होत जाशील, कारण तू कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी मानत नाही आणि तू निर्भय आहेस. मला जगाला ओरडून सांगायचे आहे की, तू किती अद्भुत व्यक्ती आहेस’
अनुष्काने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘मला माहित आहे की आपण दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून असे एकमेकांशी बोलणार नाही. परंतु कधीकधी मला फक्त जगाला ओरडून सांगावेसे वाटते की तू किती छान व्यक्ती आहेस ते.
अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये विराटला लिहिले की, ‘भाग्यवान तेच आहेत जे तुला खरोखर ओळखतात. सर्वकाही उजळ आणि अधिक सुंदर बनवल्याबद्दल धन्यवाद आणि हो, वाढदिवसाच्या शुभेच्छा क्यूटनेस!’
https://www.instagram.com/p/CV4iyW_JcnS/?utm_source=ig_web_button_share_sheet
पतीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने लिहिलेली ही पोस्ट आणि फोटोला १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून त्यावर हजारो कमेंट्स येत आहेत. चाहते विराट आणि अनुष्काच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.
अनुष्का आणि विराटने डिसेंबर २०१७ मध्ये इटलीतील टस्कनी येथे लग्न केले होते. त्यांना वामिका नावाची मुलगी आहे. सध्या तो यूएईमध्ये सुरु असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्मात परतलेल्या रोहितची बॅट स्कॉटलँडविरुद्ध ओकणार आग! अर्धशतक करताच बनेल ३ हजारी मनसबदार
‘कुंबळेचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही’, सेहवागने सांगितला जुना किस्सा





