---Advertisement---

‘काय विजय आहे! काय संघ आहे!’; विराटसेनाच्या थरारक विजयाचे अनुष्काकडून तोंडभरुन कौतुक

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 9:05 AM
Virat Kohli And Anushka Sharma
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले. या अत्यंत रोमांचक सामन्यात भारताने शानदार पुनरागमन केले आणि यजमानांच्या तोंडातून विजय हिसकावून घेतला. या ऐतिहासिक मैदानावर भारताचा हा तिसरा कसोटी विजय आहे. याआधी भारतीय संघाने लॉर्ड्सवर कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी सामना जिंकला आहे. यासह ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे.

भारताच्या या शानदार विजयावर कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भारतीय संघाशी संबंधित ३ फोटो शेअर केले आहेत. अनुष्काने कोहलीच्या फोटोवर हृदयाच्या इमोजीसह कॅप्शन लिहिले आहे की, “क्या जीत है! क्या टीम है!” (“काय विजय आहे! काय संघ आहे!”)

इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांवर जमला
ऐतिहासिक क्रिकेट मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर यजमान इंग्लंडला शेवटच्या डावात ६० षटकांत २७२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतू, संपूर्ण संघ १२० धावांवर गुंडाळला गेला. कर्णधार विराट कोहलीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या विजयाचे देशासाठी सर्वात खास भेट म्हणून वर्णन केले आहे.

मला संपूर्ण संघाचा अभिमान आहे
कोहली विजयानंतर म्हणाला, “मला संपूर्ण संघाचा खूप अभिमान आहे. पहिल्या तीन दिवस खेळपट्टीने फारशी मदत केली नाही. पहिला दिवस सर्वात आव्हानात्मक होता. दडपणाखाली आल्यानंतर आम्ही दुसऱ्या डावात ज्याप्रकारे खेळलो, विशेषत: जसप्रीत आणि शमी हे उत्कृष्ट होते. आम्हाला विश्वास होता की, आम्ही इंग्लंडला ६० षटकांत बाद करू शकतो. आमच्या दुसऱ्या डावादरम्यान मैदानावर जे घडले (दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये खूप तणाव होता) त्यामुळे आम्हाला मदत मिळाली.”

शमी-बुमराह ठरले विघ्नहर्ता
भारत सामन्याच्या अखेरच्या दिवशी संघर्ष करत होता, तेव्हा मोहम्मद शमी (७० चेंडूत नाबाद ५६) आणि जसप्रीत बुमराह (६४ चेंडूत नाबाद ३४) यांनी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची अभेद्य भागीदारी करत सामन्याचा पासा पलटवला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुम्ही मुर्खपणा करत असाल, तर तुमची सामना जिंकण्याचीही लायकी नाही,’ दिग्गजाची इंग्लंडवर जहरी टीका

टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ‘या’ दोन संघांना मिळतेय दिग्गजांची पसंती

लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---