बऱ्याचदा पापाराझी किंवा चाहते मोठमोठ्या सेलिब्रेटींचे त्यांना न विचारता फोटो काढत असतात. आता याबाबत बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने आवाज उठवला आहे. तिने तिचा आणि विराटचा फोटो काढल्याने एका न्यूज साईटवर टिका केली आहे.
झाले असे की एका न्यूज साईटने विराट आणि अनुष्काचा त्यांच्या मुंबईतील घराच्या बाल्कनीत बसलेला फोटो त्यांना न विचारता काढला आणि तो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामुळे अनुष्का भडकली असून तिने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तिचा राग व्यक्त केला आहे. दुर्दैवाने त्या फोटोवर त्या न्यूज साईटचा वॉटरमार्क आहे.
तिने म्हटले आहे की ‘या प्रकाशनास विनंती करूनही, त्यांनी अद्याप आमच्या खाजगी आयुष्यात डोकावणे सोडले नाही. हे थांबवा आता.’
विराट-अनुष्का पहिल्यांदाच बनणार पालक –
अनुष्का सध्या गर्भवती (प्रेग्नंट) असून ती त्यांच्या बाळाला या महिन्यात जन्म देणार आहे. त्यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन लवकर परतला आहे. त्याने कसोटी मालिकेतील केवळ पहिला सामना खेळला. त्यानंतर त्याने पालकत्व रजेसाठी बीसीसीआयकडे विनंती केली होती, जी बीसीसीआयने मान्य केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सिडनी कसोटीत रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, रहाणेने केला खुलासा
क्वारंटाइन नियमामुळे निर्माण झालेल्या वादावर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
तिसर्या कसोटी सामन्यात ‘हा’ २२ वर्षीय खेळाडू डेविड वॉर्नरबरोबर करु शकतो सलामीला फलंदाजी