रविवारी (11 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला. विराट कोहली याच्या रूपात भारताने शेवटच्या दिवशी आपली पहिली विकेट गमावली. विराटची ही विकेट संघासाठी अतिशय महत्वाची होती, पण आपले अर्धशतक करण्याआधीच तो तंबूत परतला. दुसरीकडे विराटची पत्नी अनुष्का शर्मा देखील सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. भारताने या अंतिम सामन्यात 209 धावांच्या अंतराने पारभव स्वीकारला.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य मिळाले. रविवारी (11 जून) सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने 3 बाद 163 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी अजिंक्य रहाणे () आणि विराट कोहली () खेळपट्टीवर होती. दोघांमध्ये 86 धावांची भागीदारी पूर्ण झाली होती. अशातच 47 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या स्कॉट बोलँड () याने कमाल दाखवली. बोलँडने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली, तर चौथ्या चेंडूवर रविंद्र जडेजा () यांच्या विकेट्स घेतल्या.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील डब्ल्यूटीसीचा हा सामना पाहण्यासाठी द ओव्हल स्टेडियमवर उपस्थित आहे. तत्पूर्वी पहिल्या डावात देखील अनुष्का स्टॅन्डमध्ये असताना विराट कोहलीने 14 धावा करून विकेट गमावली होती. अशात दुसऱ्या सामन्यात देखील अनुष्कासमोरच विराट 49 धावांवर बाद झाला. याच पार्श्वभूमीवर चाहते अनुष्काला ट्रोल करत आहेत. काहीचन अनुष्काला विराटसाठी पनौती देखील म्हणत आहेत. अनेकांच्या मते अनुष्का शर्मा विराटसाठी ‘बॅड लक’ आहे. जर ती या सामन्यासाठी आली नसती, तर विराटने मोठी खेळी केली असती, असेही नेटकरी बोलत आहेत. याव्यतिरिक्तही अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनुष्का आणि विराटविषयी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
Team India win rate when Anushka Sharma attends the match – 0%.???? pic.twitter.com/5ms9kHKUYd
— Aryan (@GujjuHitmanFan) June 11, 2023
Bahut hogya…Call me Misogynist but please ban Anushka Sharma from Stadium ????️#WTCFinals pic.twitter.com/Hd1DCF75m4
— Ahmeddd (@meeahmadd) June 11, 2023
The main reason for the dismissal of Virat Kohli.????
Agree or d!e
Anushka Sharma is panoti for Kohli.#INDvsAUS pic.twitter.com/UHy1HcYrwS— RADHE ࿗???????????? (@Iamradhe_p00) June 11, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर शेवटच्या दिवशी भारतीय संघ विजयापासून 280 धावांनी मागे आहे. पहण पहिल्याच सत्रात एकाच षटकात विराट आणि जडेजाने विकेट गमावल्यानं संघ चांगलाच अडचणीत आला. अजिंक्य रहाणे संयमी खेळ दाखवून सामना अनिर्णित करेल, असे वाटत होते. पण रहाणेने देखील 57व्या षटकात मिचेल स्टार्कच्या चेंडूवर विकेट गमावली. रहाणेने पहिल्या डावात 89, तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या. (Anushka Sharma trolled due to Virat Kohli’s wicket)
महत्वाच्या बातम्या –
रहाणेची विकेट पडताच भारतीय क्रिकेटप्रेमींचा हार्टब्रेक! ‘हा’ विश्वविक्रम करण्याचा मानही गमावला
WTC Final। एकाच षटकात फिरला सामना! पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात विराट-जडेजा तंबूत