बॉलीवूड आणि क्रिकेटचे एक खास नाते आहे. गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट तयार केले गेले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, कपिल देव आणि मोहम्मद अजहरुद्दीन या दिग्गज क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केले गेले आहेत. यामध्ये एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी, सचिन: अ बिलियन्स ड्रीम्स, ८३ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. या यादीत आता आणखी एका क्रिकेटपटूची भर पडली आहे. लवकरच दिग्गज महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या जिवनावर आधारित चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
भारतीय संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. झुलन गोस्वामीच्या नावे सर्वाधिक ३०० गडी बाद करण्याचा विक्रम आहे. गेल्या वर्षीच्या सुरूवातीला बातमी आली होती की, झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
इडन गार्डनच्या मैदानात या चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते, ज्यामध्ये अनुष्का शर्मा निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आली होती. (Anushka Sharma will play lead role in jhulan Goswami’s biopic,photos went viral on social media)
Anushka Sharma in the biopic of Indian Women's Cricket All Rounder – Jhulan Goswami.
Shoot Begins!!! pic.twitter.com/hZxkPeeC5G
— Joe Vignesh (@JyothiVignesh) January 14, 2020
माध्यमातील वृत्तानुसार, झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या कथेवर अजूनही काम सुरु आहे. त्यामुळे या चित्रपटाची शूटिंग या वर्षाच्या शेवटी सुरु होऊ शकते. कारण अनुष्का शर्मा सध्या विराट कोहलीसह इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघाला येत्या ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे अनुष्का शर्मा लवकर माघारी परतणार नाही. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे का, या चित्रपटाची शूटिंग वर्षाच्या शेवटीच सुरु होणार.
झूलन गोस्वामीला २००७ मध्ये आयसीसी क्रिकेटर ‘ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर तिला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तसेच २०१० मध्ये तिला अर्जुन पुरस्कार मिळाला होता आणि २०१२ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
सुरुवातीला साक्षी धोनीला नव्हते आवडत क्रिकेट; माहीच्या ‘या’ ३ गोष्टींमुळे बनली क्रिकेटची चाहती
धोनीच्या संगतीत ‘या’ अष्टपैलूचे पालटले नशीब, आता संघाला जिंकून देणार टी२० विश्वचषक