अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. खेळाव्यतिरिक्त मैदानाबाहेर जडेजाला त्याच्या दिलदारपणासाठी ओळखले जाते. जडेजाला बऱ्याचदा ‘सर’ असेही म्हटले जाते. परंतु त्याला ही ‘उपाधी’ आवडत नाही. याबद्दल जडेजाने खुलासा केला आहे.
“खरंतर एमएस धोनीने 3-4 वर्षांपूर्वी ट्वीट केले होते. तेव्हापासून ‘सर’ (Sir) ही उपाधी माझ्याबरोबर आहे. जर तुम्ही मला वैयक्तिकरित्या विचारालं तर, मला ही उपाधी आवडत नाही. मी लोकांना नेहमी सांगतो की, मला माझ्या नावाने आवाज देत जा. वाटलेच तर जड्डू किंवा जडेजा बोलत जा,” असे ‘सर’ या उपाधीबद्दल बोलताना जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला.
यावेळी जडेजाने आणखी एक गोष्ट सांगितली. ती अशी की, भारतीय संघातील अनेक खेळाडू त्याची चेष्टा-मस्करी करत असतात. त्यामध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) एक आहे. विराट इतरांची खूप चांगली मिमिक्री करतो.
जडेजाने क्रिकेटविषयी बोलताना सांगितले की, क्रिकेटने त्याला खूप काही दिले आहे. क्रिकेटमुळे तो अनेक वेगवेगळ्या लोकांशी भेटला आहे. तसेच त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.
गुजरातमधील जामनगरवरून येऊन जागतिक क्रिकेटवर आपले नाव कोरणारा जडेजा म्हणाला की, अशाप्रकारचा सन्मान मला क्रिकेटमुळेच मिळू शकला आहे.
2012मध्ये जडेजा आयपीएलच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. यावेळी आयपीएलबद्दल बोलताना जडेजा म्हणाला की, त्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप सुधारणा झाली होती. त्यामुळे तो क्रिकेटला आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग मानतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोरोना व्हायरसमुळे सचिनचे विक्रम तोडण्याच्या विराटच्या मिशनला खिळ?
-टाॅप ५: मांजरेकरांसह इतिहासात हाकालपट्टी झालेले ५ समालोचक