बांगलादेश आणि अफगाणिस्तान (BAN vs AFG) यांच्यातील एकदिवसीय मालिका लवकरच सुरु होणार आहे. मालिकेपूर्वी अफगाणिस्तान संघाच्या अंतरिम प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. अधिकृत घोषणेमध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज स्टुअर्ट लॉ (Stuart Law) यांची राष्ट्रीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवेदनानुसार, बोर्डाने मुख्य प्रशिक्षक पदासाठी भरती सुरू केली आहे आणि लवकरच सर्वोत्तम प्रशिक्षकाला अफगाणिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाईल. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला अंतरिम प्रशिक्षकपद देण्यात आले आहे.
एसीबीने निवेदनात म्हटले आहे की, “स्टुअर्ट लॉ आधीच बांगलादेशला पोहोचले आहेत आणि ते आगामी एकदिवसीय आणि टी२० मालिकांसाठी अंतरिम प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारताना दिसणार आहेत.”
हेही वाचा- श्रीलंकेने राखल्या इभ्रत! अखेरच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर केली मात
बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघामध्ये २३ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे आणि मार्चमध्ये दोन टी२० सामने पार पडणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २३ फेब्रुवारी तर दुसरा २५ फेब्रुवारीला आणि शेवटचा व तिसरा सामना २८ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. तसेच टी२० मालिकेतील दोन सामने ३ व ५ मार्च रोजी होणार आहेत.
१९९५ मध्ये एकमेव कसोटी खेळणाऱ्या स्टुअर्ट लॉने १९९४ ते १९९९ या कालावधीत ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२३७ धावा केल्या आहेत. २०११ च्या विश्वचषकापूर्वी ते श्रीलंकेचे अंतरिम प्रशिक्षक होते आणि २०११-१२ मध्ये बांगलादेशचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी कार्यकाळ सांभाळला होता.
अफगाणिस्तानचा २२ खेळाडूंचा संघ १२ फेब्रुवारीला बांगलादेशला पोहोचला असुन तेथे पोहचल्यानंतर कोरोनाचा कहर अफगाणिस्तान संघावर पाहायला मिळाला. अफगाणिस्तानचे ८ खेळाडू आणि सहयोगी स्टाफमधील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या चाचणीत जे खेळाडू कोरोना निगेटिव्ह आले आहेत, त्यांनी सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सराव सुरू केला आहे . अफगाणिस्तानचा प्रख्यात स्टार गोलंदाज राशिद खान आणि कर्णधार मोहम्मद नबी, जो सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी आहेत आणि लीग आत्ता सुरु आहे. त्यामुळे एकदिवसीय मालिकेपूर्वी ते संघात समाविष्ट होतील.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघात निवड होताच पठ्ठ्याने केली सामना वाचवणारी खेळी; श्रीलंकेविरुद्ध करू शकतो पदार्पण
श्रीलंकेने राखल्या इभ्रत! अखेरच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर केली मात
रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राची दणदणीत विजयाने सुरुवात! सत्यजित बच्छावची भेदक गोलंदाजी