फुटबॉल हा जगप्रसिद्ध खेळ आहे. हा इतका मनोरंजक खेळ आहे की, सामना पाहणारे प्रेक्षक सामन्यातील छोट्या छोट्या गोष्टी मन लाऊन पाहत असतात आणि ऐकत असतात. तसेच फुटबॉलचा लाईव्ह सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक स्टेडियममध्ये हजेरी लावत असतात. तसेच अनेक प्रेक्षक घरबसल्या या सामन्यांचा आनंद घेत असतात. परंतु, कधी समालोचकाला सामन्याबद्दल न सांगता गाणं गाताना ऐकलं आहे का? अनेकांना वाटेल हे काय नवीन आहे, हो पण हे खरं आहे. असाच काहीसा प्रकार लाईव्ह फुटबॉल सामन्यादरम्यान घडला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एका लाईव्ह फुटबॉलसामन्या दरम्यान जेव्हा कॅमेरा, सामना पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेकडे गेला तेव्हा अरब समालोचकाने रोमांचक सामन्याचे समालोचन करायचे सोडून चक्क त्या सौंदर्यवतीला पाहून गाणं गायला सुरुवात केली होती. त्या महीलेने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. तसेच कॅमेरामॅनचे संपूर्ण लक्ष तिच्या पायांकडे होते. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना समालोचकाचा हा मजेशीर अंदाज भावला आहे तर अनेकांनी याला चुकीचे आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी कॅमेरामॅनला देखील खरे खोटे सुनावले आहे. समालोचकाने गायलेले अरब गाणे अनेक युजर्सच्या पसंतीचे ठरत आहे. काही युजर्सने त्या समालोचकाला नोकरी वरून काढून टाकण्याची देखील मागणी केली आहे.(Arab commentator starts singing after spotting s woman in the live audience)
https://twitter.com/hfussbaIl/status/1405268247356665861
क्रिकेटमध्ये ही अनेकदा सौंदर्यवती सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावत असतात. त्यांच्यावर ही कॅमेरामॅन लक्ष केंद्रित करत असता. परंतु, समालोचकाने महिलेला पाहून गाणं गायले आहे, असा प्रकार कधीच घडला नाही. परंतु कॅमेरा समोर येणारी सौंदर्यवती रातोरात प्रसिद्ध झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
पव्हेलियनमध्ये बसून दुर्बिनने रोहित पाहात होता विराटची खेळी; नेटकरी म्हणाले, ‘हीच खरी मैत्री’
साउथम्पटन कसोटीवर पुन्हा काळे ढग आणि अंधुक प्रकाशाचे संकट, तिसऱ्या दिवसाचा खेळ बिघडणार!