भारताला महिला तिरंदाजी दीपिका कुमारीकडून खूप अपेक्षा होत्या. तिला पदकाची दावेदार मानले जात होते. मात्र, या अपेक्षा पूर्ण करण्यात ती कमी पडली. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (३० जुलै) महिला तिरंदाजीतील उपांत्यपूर्व फेरीच्या एकेरी गटातील सामन्यात दक्षिण कोरियाच्या ऍन सॅनने दीपिकाला ६-० ने अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. यासह दीपिकाचा टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील प्रवास इथेच संपला आहे.
पहिला सेट ऍन सॅनने ३०-२७ ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दीपिका खास कामगिरी करू शकली नाही. तिला सॅनने २६-२४ ने पराभूत केले. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही सॅनने दुसऱ्या सेटप्रमाणेच २६-२४ ने पराभूत केले आणि सामना खिशात घातला. यासह तिने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. (Archer Deepika Kumari bows out of the QFs against An San of South Korea)
https://twitter.com/WeAreTeamIndia/status/1420992270384263168
विशेष म्हणजे दीपिकाने सन २०१९ मध्ये टोकियो २०२०च्या टेस्ट स्पर्धेत सॅनला पराभूत केले होते. मात्र, या स्पर्धेत तिने आपला सूड घेतला.
तत्पूर्वी झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात दीपिकाने रशियाच्या सेनिया पेरोवाचा ६-५ असा सहज पराभव केला होता. हा सामन्यात तिने ५-५ अशी बरोबरी केली होती. मात्र, शूटऑफमध्ये चमकदार कामगिरी करत दीपिकाने १० गुण मिळवले, तर सेनियाने ७ गुण मिळवले. त्यामुळे दीपिकाने या सामन्यात विजय मिळवला होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना






